पुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका

पुण्यात 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड, 2 तरुणींची सुटका

हॉटेल 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. देहविक्री करणाऱ्या परप्रांतातील दोन तरुणींची पोलिसांनी सूटका केली आहे.

  • Share this:

पुणे, 16 जून- पुण्यात खडकी येथे पोलिसांनी सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. हॉटेल 'बब्बी दा ढाबा'मध्ये सेक्स रॅकेटचा भंडाफोड केला आहे. देहविक्री करणाऱ्या परप्रांतातील दोन तरुणींची पोलिसांनी सूटका केली आहे. दौंड पोलिसांनी ही कारवाई केली आहे. या प्रकरणी एकाला पोलिसांनी अटक केली असून दोघे फरार झाले आहे.

मिळालेली माहिती अशी की, खडकी येथील हॉटेल बब्बी दा ढाबा येथ परप्रांतातील तरुणींकडून देहविक्री केली जात असल्याची गोपनिय माहिती दौंड पोलिसांना मिळाली होती. त्या आधारे पोलिसांनी बनावट ग्राहक पाठवून छापा टाकला. हॉटेल मॅनेजर आनंद मारोती बोगा (रा. भिवंडी, ठाणे) याला अटक केली आहे. तर दोघे पळून जाण्यात यशस्वी झाले. पोलिसांनी मुंबई आणि कोलकाता येथून आणलेल्या दोन तरुणींची सुटका करण्यात आली आहे. दोन्ही तरुणींची रवानगी सुधारगृहात करण्यात आली आहे. या प्रकरणी पोलिसांनी गुन्हा दाखल करण्यात आला असून पोलीस फरार आरोपींचा शोध घेत आहेत.

बालकाला विवस्त्र करून तपत्या टाईल्सवर बसविले, पार्श्वभाग भाजला

वर्धा जिल्ह्यातील आर्वी येथे सहा वर्षीय बालकाला विवस्त्र करून तपत्या टाइल्सवर बसविल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे. यात बालकांचा पार्श्वभाग भाजला आहे. त्याला गंभीर दुखापत झाली आहे. आर्यन खडसे असे पीडित बालकाचे नाव आहे. आर्यनवर सध्या त्याच्यावर आर्वी येथील सामान्य रुग्णालयात उपचार सुरु आहेत. या प्रकरणी आर्वी पोलिसांत गुन्हा दाखल करण्यात आला असून आरोपीला अटक करण्यात आली आहे.

काय आहे हे प्रकरण?

गजानन खडसे (रा.राणी लक्ष्मीबाई वार्ड) यांचा सहा वर्षीय मुलगा आर्यन खडसे हा नेहमीप्रमाणे जोगना माता मंदिराच्या प्रांगणात खेळायला गेला होता. तिथे आरोपी उमेश उर्फ अमोल ढोरे आला. 'तू मंदिरातून पैसे चोरले, असे म्हणत त्याने आर्यनला बेदम मारहाण केली. एवढेच नाही तर त्याला विवस्त्र केले. त्याचे दोन्ही हातपाय बांधून मंदिराच्या आवारातील तपत्या टाईल्सवर बसविले. यात आर्यनचा पार्श्वभाग गंभीर भाजला. आर्यनला याला तातडीने सामान्य रुग्णालय हलवण्यात आले. सध्या त्याच्यावर उपचार सुरु आहे.

VIDEO: जयदत्त क्षीरसागर यांनी घेतली मंत्रिपदाची शपथ

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags:
First Published: Jun 16, 2019 04:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading