Home /News /maharashtra /

अत्यंत घृणास्पद: सातवीच्या विद्यार्थिनींना शिक्षकानेच दाखवला पॉर्न व्हिडिओ

अत्यंत घृणास्पद: सातवीच्या विद्यार्थिनींना शिक्षकानेच दाखवला पॉर्न व्हिडिओ

गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे.

औरंगाबाद,4 फेब्रुवारी: गुरु-शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी घटना समोर आली आहे. शिक्षकानेच सातवीच्या विद्यार्थिनींना पॉर्न व्हिडिओ दाखवून लगट केल्याचा धक्कादायक प्रकार सिडको परिसरातील एका शाळेत तीन आठवड्यांपूर्वी घडला. विद्यार्थिंनीने पालकांना सांगितल्यानंतर हा प्रकार समोर आला. या प्रकरणी शिक्षकाविरोधात सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा नोंदवण्यात आला आहे. सिडको भागातील एका शाळेमध्ये सातवीच्या वर्गात शिकणाऱ्या विद्यार्थिनींना शाळेतील शिक्षकानेच मोबाईलमध्ये पॉर्न व्हिडीओ दाखवला. ही घटना सुमारे तीन ते चार आठवड्यांपूर्वीची आहे. मुलींच्या वागण्यात बदल जाणवल्याने पालकांनी तिला विश्वासात घेऊन विचारल्यावर हा धक्कादायक प्रकार मुलींनी पालकांना सांगितला. नंतर पोलिस आयुक्तांकडे याबाबत तीन दिवसांपूर्वी तक्रार करण्यात आली. शिक्षकांचे निलंबित करा... आरोपी शिक्षकांचे निलंबन करण्यात यावे, यासाठी पालकांनी मंगळवारी शाळेत धाव घेतली. सर्व पालकांनी शाळेच्या मुख्याध्यापकाला घेऊन सिडको पोलिस स्टेशन गाठले होते. या प्रकरणी दुपारी सिडको पोलिस स्टेशनमध्ये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. घटना घडून सुमारे तीन ते चार आठवडे होत आहे.पालकांनी घडलेला प्रकार शाळा प्रशासनाला सांगितला होता. त्यानंतर संबंधित शिक्षकावर कारवाई होणे गरजेचे होते. मात्र, तसे न करता त्याच्याकडून सातवीचा वर्ग काढून घेऊन त्याला पहिली ते पाचवीचा वर्ग देण्यात आला आहे. या वरून पालकांमध्ये संतापाची लाट उसळली आहे. गुन्हा दाखल झाल्यानंतर शाळा प्रशासनाने संबंधित शिक्षकावर कारवाई करण्याचे आश्वासन पालकांना दिले. उच्चभ्रू सोसायटीत भामटा करता होता लहान मुलांसोबत लैंगिक चाळे दरम्यान, लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करणाऱ्या विकृत तरुणाच्या हाता पोलिसांनी बेड्या ठोकल्या आहेत. मुलांच्या प्रसंगावधनाने पोलिसांनी भामट्याला चांगलाच धडा शिकवला. भिवंडी शहरात आदर्श पार्क परिसरातील उच्चभ्रु सोसायटीच्या मोकळ्या जागेत खेळणाऱ्या मुलांसोबत एक भामटा लैंगिक चाळे करत होता. ही बाब पीडित मुलांनी आपल्या पालकांना सांगितली. पालकांनी प्रसंगावधान राखून इमारत परिसरात सुरक्षिततेसाठी लावलेले सीसीटीव्ही तपासले. मुलांनी केलेली तक्रार खरी निघाली. पालकांनी निजामपुरा पोलिस स्टेशन गाठून या प्रकाराबाबत तक्रार केली. पोलिसांनी तक्रारीची गंभीर दखल घेऊन नझराना कंपाऊंड येथील राधाकृष्ण सोसायटीच्या इमारतीत राहणारा कमलेश शांतीलाल जैन या 36 वर्षीय विकृत भामट्याच्या मुसक्या आवळून त्याच्या हाता बेड्या ठोकल्या. मिळालेली माहिती अशी की, आदर्श पार्क या परिसरातील 4 ते 9 वर्ष दरम्यानची लहान मुले-मुली इमारत परिसरात कुत्र्यासोबत खेळत असतानाच एक डोक्यावर टोपी घातलेला विकृत तरुण आपले गुप्तांग बाहेर काढून त्या ठिकाणी आला. त्याने तेथील लहान मुलांसोबत लैंगिक चाळे करण्याचा प्रयत्न केला. मुले घाबरली. ती घरी पळून गेली. मुलांच्या मनात विकृत तरुणाविषयी भीती निर्माण झाली होती. रात्री आईने मुलास कपडे बदलण्यास सांगितले असता त्याने घाबरून अंकल येईल, असे सांगत कपडे बदलण्यास नकार दिला. पालकांनी मुलांना विश्वासात घेऊन चौकशी केली असता हा धक्कादायक प्रकार समोर आला. मुलांच्या तक्रारीनंतर पालकांनी या घटनेची खातरजमा करण्यासाठी इमारत परिसरातील सीसीटीव्ही तपासले. त्यात विकृतीचे किळसवाणा प्रकार समोर आल्यावर पालकांनी निजामपुरा पोलिस ठाणे गाठून आपल्या मुलांची कैफियत मांडली. पोलिसांनी सीसीटीव्ही फुटेचच्या आधारे विकृत कमलेश शांतीलाल जैन यास त्याच्या घरातून अटक केली. त्याच्या विरोधात भादंवि कलम 354 सह पोस्को कायद्यांतर्गत कलम 12 अन्वये गुन्हा दाखल करण्यात आला आहे. आरोपीला भिवंडी कोर्टात हजर केले असता त्याला तीन दिवसांची पोलिस कोठडी ठोठावण्यात आली आहे. या गुन्ह्याचा तपास पोलिस उपनिरीक्षक बाजीराव भुसारे करत आहेत.
Published by:Sandip Parolekar
First published:

Tags: Porn video

पुढील बातम्या