राज्यातील 7 हजार शिक्षक होणार बेरोजगार? 'या' कारणामुळे नोकरी धोक्यात

राज्यातील 7 हजार शिक्षक होणार बेरोजगार? 'या' कारणामुळे नोकरी धोक्यात

अपात्र शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी शासनाने घेऊ नये, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे

  • Share this:

मुंबई, 11 फेब्रुवारी : राज्यातील शिक्षकांसाठी महत्त्वाची बातमी आहे. प्राथमिक शाळांमध्ये शिकविणाऱ्या तब्बल 7 हजार शिक्षकांची नोकरी जाण्याची शक्यता आहे. मुंबई उच्च न्यायालयाने शिक्षकांसंदर्भात एक मोठा निर्णय दिला आहे. त्यानुसार शिक्षकांनी शिक्षक पात्रता परीक्षा (TET) उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. ही परीक्षा उत्तीर्ण न झालेल्या शिक्षकांना नोकरीवर राहण्याचा अधिकार नसल्याचे उच्च न्यायालयाने स्पष्ट केलं आहे. टीईटी विरोध करणारी शिक्षकांची याचिका उच्च न्यायालयाने फेटाळून लावली आहे. परिणामी राज्यातील तब्बल 7 हजार शिक्षकांची नोकरी धोक्यात आली आहे. शिक्षण हक्क कायद्यातील तरतूदीनसार पहिली ते आठवीपर्यंतच्या विद्यार्थ्यांना शिकवणारे शिक्षक हे टीईटी उत्तीर्ण असणे आवश्यक आहे. राज्यात 13 फेब्रुवारीपासून या नियमांची अंमलबजावणी सुरू झाली आहे. मात्र त्यानंतर अनेक TET उत्तीर्ण नसलेल्या शिक्षक म्हणून रुजू झाले. या शिक्षकांना 31 मार्च 2019 पर्यंत TET उत्तीर्ण होण्याची मुदत देण्यात आली होती. येत्या जानेवारीपासून या शिक्षकांचे वेतन थांबविण्याचे आदेश शासनाने दिले आहे. याबाबत राज्याच्या शिक्षण संचालनालयाने मनुष्यबळ विकास मंत्रालयाकडे या शिक्षकांनी एक संधी देण्याची मागणी केली होती. मात्र मंत्रालयाने ही मागणी फेटाळून लावली आहे. शिक्षणाचा दर्जा राखण्यासाठी शिक्षकांनी TET उत्तीर्ण होणं गरजेचं आहे. TET नसलेल्या शिक्षणांच्या जागी उत्तीर्ण शिक्षकांनी नेमणूक करावी आणि अपात्र शिक्षकांच्या वेतनाची जबाबदारी शासनाने घेऊ नये, असे उच्च न्यायालयाने म्हटले आहे.

अन्य बातम्या

गार्गी कॉलेज सामूहिक विनयभंग, तो तरुण विद्यार्थिनींसमोर करीत होता हस्तमैथुन

मुंबईतील उच्चभ्रू भागात वृद्ध महिलेची हत्या, गाढ झोपेत धारदार सुऱ्यानं भोसकलं

First published: February 11, 2020, 1:05 PM IST

ताज्या बातम्या