Home /News /maharashtra /

चीनमध्ये 'ज्या' शहरात कोरोना व्हायरस पसरला, तिथून जवळच अडकले महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी!

चीनमध्ये 'ज्या' शहरात कोरोना व्हायरस पसरला, तिथून जवळच अडकले महाराष्ट्रातील 7 विद्यार्थी!

चीनमध्ये शिकणारे सत्तावीस भारतीय अडकले आहे. यात सात महाराष्ट्रीयन मुले आहेत.

महेश तिवारी, प्रतिनिधी गडचिरोली, 29 जानेवारी : कोरोना व्हायरसमध्ये जगभरात धुमाकूळ घातला आहे. चीनमधील कोरोना व्हायरसच्या मृतांचा आकडा 132 वर पोहोचला आहे. एकाच दिवसांत या व्हायरसने तब्बल 25 जणांचा बळी घेतला आहे. चीनच्या वुहान शहरात मोठा प्रसार झाला आहे. तिथून जवळच असलेल्या गावात महाराष्ट्रातील 7 जण अडकले आहे. चीनमध्ये शिकणारे सत्तावीस भारतीय अडकले आहे. यात सात महाराष्ट्रीयन मुले आहेत. यामध्ये गडचिरोलीचे निवृत्त तहसिलदार दयाराम भोयर यांची मुलगी सोनु भोयर यांचाही समावेश आहे. चीनच्या  वुहान शहरापासून नव्वद किलोमीटर अंतरावर सियानिंग गावात हुबे युनिवर्सिटी ऑफ सायन्स अँड टेक्नोलॉजीमध्ये एमबीबीएस करायला आलेले आहेत. एक आठवडा झाला त्या गावात कोरोना व्हायरसची काही जणांना लागण झाली आहे.  माञ, त्यामुळे  विद्यापीठाने सत्तावीस भारतीयांना बाहेर निघण्यास मनाई के आहे. त्यामुळे हे सर्वजन तिथे अडकून पडले आहे. त्यांच्याकडील असलेली जेवणाची साहित्य संपली आहे. सातही जणांनी घरच्याशी संपर्क साधला असून भारतीय दुतावासाशी संपर्क साधून मदतीची मागणी केली आहे. भारतीयांच्या सुटकेसाठी प्रयत्न चीनमधल्या वुहान शहरात सर्वात जास्त रुग्ण असून तिथेच हा व्हायरस सापडला होता. त्यामुळे चीन सरकारने हे शहर सार्वजनिक वाहतुकीपासून बंद केलं आहे. शहराचे सर्व रस्ते येण्या-जाण्यासाठी बंद केले असून नागरिकांना या शहरात जाण्यापासून आणि शहरात प्रवेश करण्यापासून नागरिकांना मज्जाव करण्यात आला आहे. या शहरात 250 ते 300 भारतीय असून त्यांना बाहेर काढण्यासाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची तयारी केंद्र सरकारने केली आहे. या भारतीयांच्या सुटकेसाठी रेस्क्यू ऑपरेशन करण्याची परवानगी केंद्र सरकारने चीनकडे मागितली आहे आणि त्याची पूर्ण तयारी केंद्र सरकारने केली आहे. चीन सरकारची परवानगी मिळताच, या भारतीयांची सुटका केली जाईल आणि 14 दिवस त्यांना वैद्यकीय देखरेखीत ठेवलं जाईल.दरम्यान भारतातील महत्त्वाच्या 21 विमानतळांवर चीनहून भारतात येणाऱ्या प्रवाशांची तपासणी केली जाते आहे. यामध्ये दिल्ली, हैदराबाद, मुंबई कोचिन, बंगळुरू, अहमदाबाद, अमृतसर, कोलकाता, कोइंबतूर, गुवाहाटी, गया, जयपरू, लखनऊ, चेन्नई, त्रिवेंद्रम, त्रिची, वाराणसी, भुवनेश्वर, गोवा या विमानतळांचा समावेश आहे. कोरोनाव्हायरसची लक्षणं सर्दी ताप खोकला घसा खवखवणे श्वास घेताना त्रास डोकेदुखी कोरनाव्हायरसचा धोका टाळण्यासाठी काय कराल? हात स्वच्छ धुवा शिंकताना, खोकताना तोंडासमोर रुमाल धरा सर्दी-खोकला-तापाची लक्षणं दिसल्यास त्या व्यक्तीच्या जास्त संपर्कात राहू नका प्राण्यांपासून दूर राहा

तुमच्या शहरातून (महाराष्ट्र)

Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या