मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मेथीची भाजी खाल्यानं एकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

मेथीची भाजी खाल्यानं एकाचा मृत्यू, नातेवाईकांचा आरोप

मेथी ही खरंतर रोजच्या जेवणातली भाजी...मेथी तशी चवीला थोडीफार कडू असली तरी आरोग्यास नक्कीच उत्तम असते. पण याच मेथीच्या भाजीतून 6 जणांना विषबाधा...

मेथी ही खरंतर रोजच्या जेवणातली भाजी...मेथी तशी चवीला थोडीफार कडू असली तरी आरोग्यास नक्कीच उत्तम असते. पण याच मेथीच्या भाजीतून 6 जणांना विषबाधा...

मेथी ही खरंतर रोजच्या जेवणातली भाजी...मेथी तशी चवीला थोडीफार कडू असली तरी आरोग्यास नक्कीच उत्तम असते. पण याच मेथीच्या भाजीतून 6 जणांना विषबाधा...

    मुजीब शेख,प्रतिनिधी नांदेड,21 डिसेंबर : नांदेडमध्ये मेथीची भाजी खाल्ल्यानं एका रुग्णाचा मृत्यू झाल्याचा आरोप होतोय. पंधरा दिवसांपूर्वी जळगावमध्येही मेथी खाल्यानं एक जण दगावल्याचा आरोप झाला होता. या दोन्ही घटनांमध्ये मृत्यूचं नेमकं कारण समोर आलं नसलं तरी सामान्यांची भाजी अशी ओळख असलेली मेथी मात्र, संशयाच्या भोवऱ्यात सापडली आहे. मेथी ही खरंतर रोजच्या जेवणातली भाजी. मेथी तशी चवीला थोडीफार कडू असली तरी आरोग्यास नक्कीच उत्तम असते. पण याच मेथीच्या भाजीतून 6 जणांना विषबाधा झाल्याचा आरोप होतोय. नांदेडमधल्या कळगावात हा प्रकार उघडकीस आला. 65 वर्षीय धोंडिबा कदम यांचा विषबाधेतून मृत्यू झाला आहे. गुरुवारी सकाळी कदम कुटुंबीयांनी मेथीची भाजी आणि भाकर खाली. नंतर सर्वजण शेतात कामाला देखील गेले. सायंकाळी मात्र धोंडिबा कदम यांना चक्कर येऊन पोटात मळमळ आणि उलट्याचा त्रास सुरू झाला. त्यांच्या पाठोपाठ पद्मिनी कदम,आनंदा कोंडीबा यांना देखील असाच त्रास सुरू झाला. या तिघांना उमरी ग्रामीण रुगणलाय दाखल करण्यात आलं होतं. रात्रीतून आणखी चार जणांना उलट्या संडास झाल्यानं त्यांना देखील ग्रामीण रुग्णालयात दाखल करण्यात आलं होतं. रात्रभर सर्वांवर उपचार करण्यात आले. शुक्रवारी मात्र उपचारादरम्यान कोंडीबा कदम यांचा मृत्यू झाला. अन्य सहा जणांना नंतर जिल्हा रुग्णालयात हलवण्यात आलं आहे. दरम्यान, कदम कुटुंबांसह गावातील आठ दहा घरांना त्याच नळातून पाणी मिळतं. त्यामुळे पाण्यातून नव्हे तर जेवणातून विषबाधा झाल्याचा आरोग्य विभागाचा अंदाज आहे. आरोग्य विभागाच्या पथकानं पाण्याचे नमुनं तपासणीसाठी घेतले आहे. रुग्णालयात दाखल असलेल्या सर्वांची प्रकृती धोक्याबाहेर आहे. त्यांच्या पोटातील अन्न कण  तपासणीसाठी प्रयोग शाळेत पाठवण्यात आले आहेत. प्रयोगशाळेतील अहवालानंतरच विषबाधेच नेमकं कारण स्पष्ट होईल असं डॉक्टरांनी सांगितलं आहे.  मेथी खाल्यानं मृत्यू झाल्याचं अद्याप सिद्ध झालं नसलं तरी मेथीच्या भाजीवर शेतकरी अनेकदा किटकनाशकांची फवारणी करतात, त्यामुळे ती भाजी न धुता तशीच खाल्ली तर त्यातून विषबाधा होण्याची शक्यता नाकारता येत नाही. म्हणूनच बाजारातून आणलेल्या भाज्या शिजवण्याआधी स्वच्छ धुवून घ्याव्यात. हाच त्यावरचा तातडीचा उपाय आहे. ========================
    First published:

    Tags: Fenugreek, Nanded, Nanded news, Poisoned, नांदेड, मेथी

    पुढील बातम्या