मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /एकनाथ शिंदे यांच्याबाबत सात महिन्यांपूर्वीचे भाकीत खरे ठरले; जळगावच्या महिला ज्योतिषाचार्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्याबाबत सात महिन्यांपूर्वीचे भाकीत खरे ठरले; जळगावच्या महिला ज्योतिषाचार्याचा दावा

एकनाथ शिंदे यांच्याबाबत सात महिन्यांपूर्वीचे भाकीत खरे ठरले

एकनाथ शिंदे यांच्याबाबत सात महिन्यांपूर्वीचे भाकीत खरे ठरले

मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्याबाबत सात महिन्यांपूर्वीचे भाकीत खरे ठरले असल्याचा गावा एका महिला ज्योतिषाचार्याने केला आहे.

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Jalgaon, India

नितीन नांदुरकर, प्रतिनिधी

जळगाव, 31 जानेवारी : सहा महिन्यांपूर्वी राज्यात मुख्यमंत्री एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदारांनी बंड केलं. यानंतर उद्धव ठाकरे यांचं सरकार कोसळलं आणि एकनाथ शिंदे मुख्यमंत्री झाले. ही राज्याच्या राजकारणातील मोठी घटना होती. याबाबतचा एक मोठा दावा जळगावतील महिला ज्योतिषाचार्य डॉ. ज्योती जोशी यांनी केला आहे.

उद्धव ठाकरे यांचे सरकार कोसळेल व एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील, असं भाकीत जळगाव शहरातील एक महिला ज्योतिषाचार्य यांनी व्यक्त केलं होतं. याबाबत त्यांनी युट्युब या सोशल मीडिया साइटवर व्हिडिओ सुद्धा अपलोड केला होता. त्यांनी एकनाथ शिंदेंबाबत केलेलं भाकित खरं ठरलं असल्याचा दावा आज डॉ. ज्योती जोशी यांनी आज जळगावातील पत्रकार परिषदेत केला आहे.

वाचा - शिंदे गटाचे नेते अर्जुन खोतकरांना मोठा दिलासा; जावई विजय झोल यांना अटकपूर्व जामीन मंजूर

ज्योतिष आचार्य डॉ. ज्योती जोशी यांचे जळगाव येथे ज्योतिष्य संशोधन केंद्र आहे. या संशोधन केंद्राच्या वतीने तीन दिवसीय शिबिराचं आयोजन करण्यात आलं आहे. या शिबिराची माहिती देण्यासाठी आज पत्रकार परिषदेचे आयोजन करण्यात आलं होतं. या पत्रकार परिषदेत डॉक्टर ज्योती जोशी यांनी उद्धव ठाकरे सरकार कोसळण्यासह एकनाथ शिंदे मुख्यमंत्री होतील यांच्याबाबत ज्योतिष शास्त्राच्या आधारावर केलेल्या भाकिताबाबतची माहिती दिली. एकनाथ शिंदे यांच्यासह 40 आमदार उद्धव ठाकरे यांना सोडून शिवसेनेतून बाहेर पडले. या राजकीय घटनेनंतर डॉ. ज्योती जोशी यांनी त्यांच्या स्वतःच्या यू ट्यूब चॅनेलवर व्हिडिओ अपलोड केला होता. शिवसेनेचा सेनापती राजा होईल, अशा आशयाखाली त्यांनी एकनाथ शिंदे हे मुख्यमंत्री होतील, या आधारावर भाकीत केलं होतं.

हा ज्योतिष शास्त्राचा विजय : डॉ. ज्योती जोशी

गुगलच्या माध्यमातून देवेंद्र फडणवीस आणि एकनाथ शिंदे यांची पत्रिका मिळवली. एकनाथ शिंदे यांची जन्म तारीख सुद्धा गुगलच्या माध्यमातून शोधून काढली. त्याआधारावर तसेच काळ मापन यंत्रावर त्यांनी अभ्यास केला होता. या आधारावर एकनाथ शिंदे यांचा राजकीय भवितव्यबाबत व्हिडिओच्या माध्यमातून दावा केला होता. यात ज्या सांगितलेल्या तारखा आहेत, त्यानंतर नऊ दिवसानी पुढे मी केलेला हा दावा खरा ठरला, यावेळी प्रचंड फोन मला आले होते. हा ज्योतिष शास्त्राचा विजय असल्याचा डॉ. ज्योती जोशी यांनी म्हटलं आहे.

First published:

Tags: Eknath Shinde, Uddhav Thackeray