गडचिरोलीत पोलिसांनी केला 7 माओवाद्यांचा खात्मा

गडचिरोलीत  पोलिसांनी  केला 7 माओवाद्यांचा खात्मा

मृत माओवाद्यांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे, असंही कळतंय. या चकमकीत मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ठार केलेले सर्व माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओईस्ट या संघटनेचे सदस्य होते.

  • Share this:

06 डिसेंबर, गडचिरोली :  गडचिरोलीत पोलिसांसोबत झालेल्या चकमकीत सात माओवाद्यांचा खात्मा करण्यात आलाय. सिरोंचा पोलीसांनी ही कारवाई केलीय.

झिन्नूरजवळ कल्लेड जंगलात ही कारवाई केली गेली आहे. मृत माओवाद्यांमध्ये ५ महिलांचा समावेश आहे, असंही कळतंय. या चकमकीत मोठा शस्त्रसाठाही जप्त करण्यात आला आहे. ठार केलेले सर्व माओवादी कम्युनिस्ट पार्टी ऑफ इंडिया माओईस्ट या संघटनेचे सदस्य होते. झिंगानूर पोलीस स्टेशनपासून १५ किलोमीटरवर असलेल्या कल्लेड गावात आज सकाळी ७ वाजता ही चकमक झाली.

गेल्या २ आठवड्यांमध्ये ३ नागरिक आणि सीआरपीएफचे २ जवानांची माओवाद्यांनी हत्या केली. त्यानंतर पोलिसांच्या कारवाईला वेग आलाय. अतिरिक्त पोलीस महासंचालक पदावरचे एक अधिकारी गडचिरोलीत तळ ठोकून आहेत, अशीही बातमी कळतेय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Dec 6, 2017 01:16 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading