धक्कादायक! रुग्णालयात सापडलं गर्भपात किट, बेकायदा औषधं आणि दारूच्या बाटल्या

धक्कादायक! रुग्णालयात सापडलं गर्भपात किट, बेकायदा औषधं आणि दारूच्या बाटल्या

सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमध्ये सात बेकायदा गर्भपात झाले असल्याची धक्कादायक माहिती उघडं झाली आहे.

  • Share this:

असिफ मुरसल, प्रतिनिधी

सांगली, 15 सप्टेंबर : सांगली पुन्हा एकदा बेकायदा गर्भपाताच्या घटनेने हादरलंय. सांगलीतील चौगुले हॉस्पिटलमध्ये सात बेकायदा गर्भपात झाले असल्याची धक्कादायक माहिती उघडं झाली आहे. या सगळा प्रकार करण्यामागे डॉक्टर रुपाली चौगुले यांचा हात आहे. या प्रकरणात त्यांना पोलिसांनी ताब्यात घेतलं आहे.

बेकायदेशीररीत्या सात गर्भपात केल्या माहिती पोलिसांना मिळताच त्यांनी चौगुले हॉस्पिटलवर धाड टाकली. या धाडीत संशयास्पद कागदपत्रे आणि औषधेही जप्त करण्यात आली आहेत. पोलिसांनी केलेल्या चौकशीनुसार चौगुले दवाखान्यात सापडली ही सामग्री गर्भपाताचीच असल्याचं उघडं झालं आहे.

पोलिसांनी रुग्णालय परिसरातून गर्भपाताचे किट ताब्यात घेतले आहे. तर सगळ्यात धक्कादायक म्हणजे रुग्णालायता पोलिसांना दारूच्या बाटल्याही सापडल्या. त्यामुळे हे नक्की रुग्णालय होतं की दारुचा अड्डा असा प्रश्न आता उपस्थित होतो.

पोलिसांनी आणि वैद्यकीय विभागाने घातलेल्या छाप्यात रुग्णालयाचा हा भोंगळ कारभार उघडा पडलाय. सांगलीतल्या या घटनेनं म्हैसाळ गर्भपात प्रकरणाची पुनरावृत्ती असं म्हणायला हरकत नाही.

VIDEO गणेश चतुर्थी विशेष : बाप्पाच्या नैवेद्याला आवश्यक ५ गोष्टी

First published: September 15, 2018, 3:40 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading