मराठा आरक्षणावरून कोर्टाचा राज्य सरकारला मोठा धक्का

मराठा आरक्षणावरून कोर्टाचा राज्य सरकारला मोठा धक्का

'महाराष्ट्र सरकारने आधी जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावं'

  • Share this:

नवी दिल्ली, 30 मे : वैद्यकीय शिक्षणात मराठा समाजाला आरक्षण देता येणार नाही, असा निर्णय सुप्रीम कोर्टाने दिला आहे. त्यामुळे हा महाराष्ट्र सरकारसाठी मोठा धक्का मानला जात आहे. त्यामुळे या मुद्द्यावरून सरकारच्या अडचणीत वाढ झाली आहे.

महाराष्ट्र सरकारने आधी जागा वाढवाव्यात आणि त्यानंतर मराठा समाजाला आरक्षण द्यावं, असा सल्ला सुप्रीम कोर्टाकडून देण्यात आला आहे. त्यामुळे वैद्यकीय प्रवेश प्रक्रियेत मराठा विद्यार्थांना दिलासा देण्यासाठी सरकार काय पाऊलं उचलणार, हे आता पाहावं लागेल.

मेडिकल पीजी कोर्सला यंदा मराठा आरक्षण लागू करण्याच्या संदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला सुप्रीम कोर्टात आव्हान देण्यात आले होते. अध्यादेशाविरोधातील ही याचिका सुप्रीम कोर्टाने याआधीच फेटाळली होती. यासाठी सुप्रीम कोर्टात येण्याची गरज नव्हती, असंही कोर्टाने फटकारले होतं. कलम 32 अन्वये हायकोर्टात जाण्याचे आदेश दिले.

मराठा आरक्षणासंदर्भात राज्य सरकारने काढलेल्या अध्यादेशाला आव्हान देणाऱ्या याचिका सुप्रीम कोर्टाने फेटाळली या सर्व याचिका ना याचिकाकर्त्यांनी मुंबई हायकोर्टात आव्हान द्यावे, असा आदेश दिल्ली सुप्रीम कोर्टाने काढला, अशी माहिती राज्य सरकारचे वकील अॅडवोकेट निशांत कातनेश्वरकर यांनी दिली होती.

VIDEO: उद्धव ठाकरेंकडून मंत्रिपदासाठी 'या' एकमेव व्यक्तीच्या नावाची शिफारस

First published: May 30, 2019, 11:22 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading