Home /News /maharashtra /

इंदोरीकर महाराजांचा पाय आणखी खोलात, अडचणी वाढण्याची शक्यता

इंदोरीकर महाराजांचा पाय आणखी खोलात, अडचणी वाढण्याची शक्यता

इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे.

    मुंबई, 2 मार्च : वादग्रस्त वक्तव्याप्रकरणी गेल्या काही दिवसांपासून चर्चेत असणाऱ्या कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांचा पाय आणखीनच खोलात गेला आहे. कारण त्या वक्तव्याप्रकरणी आता इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल होण्याची शक्यता आहे. इंदोरीकर महाराज यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचा व्हिडिओ अंधश्रद्धा निर्मूलन समितीने जिल्हा शल्यचिकित्सकडे सोपवला आहे. हा व्हिडिओ तपासून आता इंदोरीकर महाराज यांच्यावर पुढील कारवाई करण्यात येणार आहे. त्यामुळे खरंच इंदोरीकर महाराज यांच्यावर गुन्हा दाखल करण्यात येतो का, याकडे सर्वांचं लक्ष लागलं आहे. '10 दिवसांमध्ये माफी मागा नाहीतर...' कीर्तनकार इंदोरीकर महाराज यांच्या विधानावरून सुरू असलेला वाद थांबता थांबेना, असं चित्र आहे. त्यातच आता पुन्हा एकदा भूमाता ब्रिगेडच्या तृप्ती देसाई या आक्रमक झाल्या असून त्यांनी आपल्या वकिलामार्फत इंदोरीकर महाराजांना कायदेशीर नोटीस पाठवली आहे. 'वादग्रस्त विधानाप्रकरणी 10 दिवसांमध्ये माफी मागा, अन्यथा आम्ही कोर्टात जाऊ,' असा इशारा तृप्ती देसाई यांनी दिला आहे. काही दिवसांपूर्वी इंदोरीकर महाराज यांनी आपल्या वक्तव्याप्रकरणी खेद व्यक्त केला होता. मात्र तृप्ती देसाई यांनी इंदोरकीर यांच्याकडे माफी मागण्याचीच मागणी केली आहे. त्यामुळे आता इंदोरीकर महाराज नेमकी काय भूमिका घेतात, हे पाहावं लागेल. हेही वाचा- महाराष्ट्राला हादरवणारी बातमी, बलात्काराची केस मागे घेण्यासाठी नवरा-बायकोला विवस्त्र करून बेदम मारहाण नेमकं इंदुरीकर महाराज काय बोलले होते? 'स्त्री संग सम तिथीला झाला तर मुलगा होतो, विषम तिथीला झाला तर मुलगी होते आणि स्त्री संग जर अशीव वेळेला झाला तर ती रांगडी, बेवडी आणि खानदान मातीत मिळवणारी होतात. जर टाईमिंग हुकला की क्वालिटी खराब असं सांगत, पुलश्य नावाच्या ऋषींनी कैकसी नावाच्या स्त्रीशी सूर्य अस्ताला जाताना संग केला तर रावण, बिभीषण, कुंभकर्ण जन्माला आला तर आदिती नावाच्या ऋषीने पवित्र दिवशी संग केला तर त्याच्या पोटी हिराण्यक्ष नावाचा राक्षस जन्माला आला हिरण्यकक्षपूने नारायण म्हणून संग केला तर भक्त प्रल्हाद जन्माला आला,'असं वक्तव्य इंदोरीकर महाराज यांनी केल्याचं एका व्हिडिओतून स्पष्ट होत आहे.
    Published by:Akshay Shitole
    First published:

    Tags: Ahmednagar, Indurikar maharaj video

    पुढील बातम्या