मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कधीही अटक होण्याची शक्यता

गोपीचंद पडळकरांना कोर्टाचा दणका, जामीन अर्ज फेटाळला, कधीही अटक होण्याची शक्यता

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

भाजप आमदार गोपीचंद पडळकर

आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे.

  • Published by:  Chetan Patil

सांगली : सांगलीच्या आटपाडी राडा प्रकरणी भाजप आमदार गोपीचंद पडळकर (Gopichand Padalkar) यांना सेशन कोर्टाने (Sessions Court) मोठा झटका दिला आहे. कोर्टाने पडळकर आणि माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील (Tanaji Patil) यांचा अटकपूर्व जामीन फेटाळला आहे. सेशन कोर्टाचे न्यायाधीश आर. व्ही. जगताप यांच्यासमोर सुनावणी झाली. यावेळी कोर्टाने पडळकरांचा जामीन अर्ज फेटाळला.

नेमकं प्रकरण काय?

सांगली जिल्हा बँकेच्या निवडणुकीच्या धामधुमीत आटपाडीत 7 नोव्हेंबरला झालेल्या राड्यामुळे तणावाचे वातावरण आहे. आमदारांनी अंगावर गाडी घालून ठार मारण्याचा प्रयत्न केला, असा आरोप राष्ट्रवादी काँग्रेसचे नेते राजू जानकर यांनी केला. त्यानंतर संतप्त कार्यकर्त्यांनी पडळकरांच्या गाडीवर दगडफेक करीत गाडीची तोडफोड केली. त्यानंतर पोलिसात दोन्ही पक्षांकडून परस्पर विरोधी फिर्यादी देण्यात आल्या होत्या. या प्रकरणी दहा जणांविरुद्ध गुन्हे दाखल झाले आहेत.

हेही वाचा : आर्यन खान प्रकरणानंतर आणखी एका प्रकरणाने समीर वानखेडेंचं टेन्शन वाढणार?

पडळकरांवर खुनी हल्ल्याचा गुन्हा

आमदार पडळकर यांच्यावर खुनी हल्ल्याचा, तर माजी जिल्हा परिषद सदस्य तानाजी पाटील यांच्यावरही बेकायदा जमाव जमवल्याप्रकरणी आटपाडी पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल झाला आहे. या प्रकरणाचा तपास स्थानिक गुन्हे अन्वेषणकडे सोपविण्यात आला आहे. त्यांच्याकडून आटपाडी तालुक्यात छापेमारी करण्यात आली.

हेही वाचा : राज्यातील 7 हजार ग्रामपंचायत सदस्यांच्या पोटनिवडणुकांसाठी तारखा जाहीर

पोलिसांकडून चार अलिशान गाड्या जप्त

पोलिसांनी आमदार पडळकर, तानाजी पाटील, राष्ट्रवादीचे राजू जानकर यांची अलिशान चार वाहने जप्त केली. त्यानंतर आमदार पडळकर आणि तानाजी पाटील यांनी अटक पूर्व जामीनासाठी कोर्टात धाव घेतली. त्यावर आज सुनावणी झाली असून तो अर्ज न्यायालयाने फेटाळला. त्यामुळे कोणत्याही क्षणी दोघांना अटक होण्याची शक्यता वर्तविली जात आहे.

First published: