मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

Serum CEO अदार पुनावालांनी माहिती द्यावी, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचं गृह राज्यमंत्र्यांचं आश्वासन

Serum CEO अदार पुनावालांनी माहिती द्यावी, धमकी देणाऱ्यांवर कारवाई करण्याचं गृह राज्यमंत्र्यांचं आश्वासन

Serum CEO अदार पुनावाला यांनी लसीच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर प्रचंड तणाव आल्याची माहिती दिली आहे. तसंच त्यामुळं काही दिवसांसाठी लंडनला गेल्याचं ते म्हणाले.

  • Published by:  News18 Desk

अहमदनगर, 03मे : कोविशिल्ड लसीची (covishield vaccine) निर्मिती करणाऱ्या सीरम इन्स्टिट्यूटचे (serum institute) सीईओ अदार पुनावाला (Adar Poonawala) यांनी लंडनमध्ये दिलेल्या एका मुलाखतीनं सध्या खळबळ उडाली आहे. पुनावाला यांनी लसीच्या मुद्द्यावरून त्यांच्यावर काही बड्या व्यक्तींनी दबाव टाकत धमकीवजा फोन केल्याचं (Adar Poonawala threat calls) म्हटलं आहे. यावर पुनावाला यांनी सरकारला माहिती द्यावी अशा लोकांवर सरकार कारवाई करेल असं आश्वासन राज्याचे गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई (Shambhuraj Desai) यांनी दिलं आहे.

(वाचा-कोरोनाग्रस्त वडिलांची ऑक्सिजन पातळी खालावली;ICU मधील मुलाने बापासाठी बेड दिला)

सीरमचे सीईओ अदार पुनावाला हे सध्या इंग्लंडमध्ये त्यांच्या कुटुंबीयांबरोबर आहेत. देशात कोरोनाच्या लसींचा तुटवडा निर्माण झाल्यानंतर आपल्यावर मोठ्या प्रमाणात दबाव असल्याचं पुनावाला यांनी लंडनमध्ये एका मुलाखतीत सांगितलं. कोरोनाच्या लसींसाठी देशातील अनेक बड्या व्यक्तींनी फोन करून दबाव टाकल्याचं पुनावाला यांनी सांगितलं. फोन करण्यांनी धमकीवजा इशारे दिल्याचंही त्यांनी म्हटलं होतं. फोन करणाऱ्यांमध्ये काही राज्यांचे मुख्यमंत्री आणि बड्या उद्योगपतींचा समावेश होता, असंही त्यांनी मुलाखतीत सांगितलं.

(वाचा-दीदींना मोठा विजय मिळवून देऊनही निवडणूक 'चाणक्यां'चे संन्यास घेण्याचे संकेत)

या प्रकारानंतर पुनावाला हे प्रचंड दबावात आणि घाबरलेलेही होते. या संपूर्ण प्रकारानंतर पुनावाला यांना Y दर्जाची सुरक्षा पुरवण्यात आली होती. हा संपूर्ण प्रकार अत्यंत गंभीर असल्याचं गृहराज्यमंत्री शंभूराज देसाई यांनी म्हटलं आहे. अदार पुनावाला हे जिथं कुठं असतील त्याठिकाणी त्यांनी पोलिसांना याबाबत माहिती द्यावी. या प्रकरणाची सखोल चौकशी करण्यात येईल, असंही देसाई यांनी म्हटलं आहे. तसंच पुनावाला यांना कुठून फोन आले, कोणी फोन केले याची चौकशी करून कारवाई करण्यात येईल असं आश्वासनही देसाईंनी दिलं आहे.

अदार पुनावाला यांनी लवकरच भारतात परतणार असल्याचं म्हटलं आहे. तसंच कोरोनाच्या लसींचं उत्पादन पूर्ण क्षमतेनं सुरू असल्याचंही त्यांनी सांगितलं आहे. याबाबतीत जे काही शक्य असेल ते करणार असल्याचं त्यांनी सांगितलंय. मात्र कोरोना विरोधातील लढ्यात अत्यंत महत्त्वाची अशी भूमिका बजावणाऱ्यांची काळजी घेणं गरजेचं आहे.

First published:

Tags: Corona vaccine, Coronavirus