मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'भाजप शिस्तबद्ध पक्ष, बोम्मई असं बोलूच शकत नाहीत, पण...'; सीमावादाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

'भाजप शिस्तबद्ध पक्ष, बोम्मई असं बोलूच शकत नाहीत, पण...'; सीमावादाबाबत संजय राऊतांचा मोठा दावा

राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं असून शिवाजी महाराजांचा विषय विसरावा म्हणून बोम्मईंना स्क्रीप्ट लिहून दिली गेली. बोम्मईंचं वक्तव्य हे ठरवलेली स्क्रिप्ट आहे, असा दावा राऊतांनी केला

  • News18 Lokmat
  • Last Updated :
  • Mumbai, India
  • Published by:  Kiran Pharate

मुंबई 25 नोव्हेंबर : शिवसेना खासदार संजय राऊत यांनी महाराष्ट्र-कर्नाटक सीमावाद प्रश्नावरुन भाजपवर सडकून टीका केली आहे. राज्यपालांकडून झालेल्या शिवाजी महाराजांच्या अपमानाचा विषय मागे टाकण्यासाठी हा मुद्दा भाजप पुढे आणत आहे. देशातील कोणतेही भाजप पक्षाचे मुख्यमंत्री असं बोलत नाहीत. भाजप हा शिस्तबद्ध पक्ष आहे. मात्र, लक्ष विचलित करण्यासाठी कर्नाटकच्या मुख्यमंत्र्यांना ही स्क्रिप्ट दिली गेली आहे, असा आरोप संजय राऊत यांनी केला आहे.

ठाकरेंसह भाजप आणि मनसेलाही धक्का; नाशकातील नगरसेवकांचा मोठा गट शिंदेंसोबत जाणार

संजय राऊत म्हणाले, की राज्यपालांनी मराठी माणसाचा अपमान केला, तेव्हा लक्ष विचलित करण्यासाठी संजय राऊतला अटक केली. आता राज्यपालांनी शिवाजी महाराजांबद्दल वक्तव्य केलं असून शिवाजी महाराजांचा विषय विसरावा म्हणून बोम्मईंना स्क्रीप्ट लिहून दिली गेली. बोम्मईंचं वक्तव्य हे ठरवलेली स्क्रिप्ट आहे, असा दावा राऊतांनी केला

राऊत पुढे म्हणाले, की ही बोंब मारण्यामागे कारस्थान आहे. अन्यथा बोम्मई असं बोलूच शकत नाही. महाराजांच्या अपमानाचा विषय मागे पाडण्यासाठी हे केलं जात आहे. मात्र, राज्यपालांच्या वक्तव्याविरोधात राज्यात संताप आहे. आम्ही महाराजांचा अपमान विसरणार नाही. महाराष्ट्रातील जनता हे कटकारस्थान खपवून घेणार नाही. उद्धव ठाकरेंनी कालच ह्या अपमानाच्याविरोधात युद्ध पुकारले आहे. महाभारत लढायची वेळ आली तर शिवसेना मागे हटणार नाही, असा इशारा संजय राऊत यांनी दिला.

'नेहरूंची ती चूक मोदी का सुधारत नाहीत?'; महाराष्ट्र-कर्नाटक सीमावादावरुन ठाकरे गटाची सडकून टीका

संजय राऊत यांनी यावेळी शिंदे गटावरही सडकून टीका केली. गुवाहाटीला जाऊदे किंवा लंकेत 40 आमदारांचे लोकांच्या मनामधून नामोनिशाण नाहीसे झाले आहे . दोन महिन्यांनंतर त्यांच्या कुंडलीत सत्ता योग नाही, मलाही कुंडली बघता येते, असा दावा संजय राऊत यांनी केला. याआधीही पक्षांतर झालेत, यापुढेही होतील. मात्र, यांनी डीएनएच बदललं. इतकं घाणेरडं राजकारण महाराष्ट्रात कधीच झालं नाही. हे लोक जनतेच्या हृदयातून हद्दपार झाले आहेत. तंत्रमंत्राचा अघोरी प्रयोग करणाऱ्यांचा शेवटही अघोरी होतो, असा टोला त्यांनी मुख्यमंत्री एकनाथ शिंदेंना लगावला.

First published:

Tags: Cm eknath shinde, Devendra Fadnavis, Sanjay raut