मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

राऊतांपाठोपाठ शिवसेनेचा हा बडा नेता तुरुंगात जाणार; रवी राणांचा खळबळजनक दावा

राऊतांपाठोपाठ शिवसेनेचा हा बडा नेता तुरुंगात जाणार; रवी राणांचा खळबळजनक दावा

फाईल फोटो

फाईल फोटो

रवी राणा (Ravi Rana) म्हणाले, की संजय राऊत (Sanjay Raut) यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बिल्डरांकडून आणि व्यवसायिकांकडून अवैध पैसा गोळा केला आणि मोठा भ्रष्टाचार केला

अमरावती 01 ऑगस्ट : शिवसेना नेते संजय राऊत (Sanjay Raut) यांना ईडीने मध्यरात्रीनंतर अटक केली आहे. संजय राऊतांची रविवारी सकाळपासून चौकशी सुरु होती. अखेर मध्यरात्री त्यांना अटक करण्यात आली. यावर आता आमदार रवी राणा यांनीही प्रतिक्रिया दिली आहे. यावेळी बोलताना त्यांनी राऊतांवर अनेक गंभीर आरोप केले आहेत. रवी राणा म्हणाले, की संजय राऊत यांनी महाविकास आघाडी सरकार स्थापन केल्यानंतर मोठ्या प्रमाणात बिल्डरांकडून आणि व्यवसायिकांकडून अवैध पैसा गोळा केला आणि मोठा भ्रष्टाचार केला. याशिवाय महाविकास आघाडी सरकारची स्थापना करण्यासाठी संजय राऊत यांनी राष्ट्रवादी आणि काँग्रेसकडूनही मोठी रक्कम घेतली होती, असा आरोपही रवी राणा यांनी केला आहे. या पैशांचीही चौकशी व्हावी, अशी मागणीही त्यांनी केली. संजय राऊतांच्या अटकेनंतर भाऊ सुनील यांची पहिली प्रतिक्रिया, ED वर गंभीर आरोप याशिवाय संजय राऊत यांच्याप्रमाणेच अनिल परब यांनीही अनेक घोटाळे केले आहे आणि मोठ्या प्रमाणात भ्रष्टाचार केला आहे. त्यामुळे राऊतांपाठोपाठ परब यांच्यावरही अटकेची टांगती तलवार असल्याचं भाकीत आमदार रवी राणा यांनी केलं आहे. काय आहे प्रकरण? मुंबईमधील गोरेगाव येथील पत्राचाळीत महाराष्ट्र गृहनिर्माण आणि क्षेत्र विकास प्राधिकरणाचा भूखंड आहे. पत्राचाळ परिसरातील 672 कुटुंबीयांचा पुनर्विकास करण्यासाठी 2008 मध्ये मे. गुरू-आशीष कन्स्ट्रक्शन्सची रहिवाशांनी नियुक्ती केली. मात्र त्यांनी या जागेचा काही भाग खासगी बिल्डरांना विकला. प्रवीण राऊत यांच्यावर पत्राचाळमध्ये राहणाऱ्या नागरिकांची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आशिष कन्स्ट्रक्शनला पत्राचाळमधील तीन हजार फ्लॅट बांधकाम करून 672 फ्लॅट भाडेकरूला द्यायचे होते. उर्वरित फ्लॅट म्हाडा आणि विकासक यांच्यात वाटून घ्यायचे होते. मात्र 2010 मध्ये प्रवीण राऊत यांनी गुरू आशिष कन्स्ट्रक्शन कंपनीचे काही शेअर एचडीआयएलला विकले 'ईडीला घाबरून आमच्याकडे किंवा भाजपकडे येण्याचं पुण्य..'; मुख्यमंत्र्यांचा संजय राऊतांना टोला या प्रकरणातील पैसा नेमका कुठे गेला यासंदर्भात ईडीने केलेल्या तपासामध्ये प्रवीण राऊत यांच्या नावाने एचडीआयएलमधून 100 कोटी वळवण्यात आल्याचं समोर आलं. 2010 मध्ये या आर्थिक घोटाळ्यातील 55 लाखांची रक्कम ही प्रवीण राऊत यांची पत्नी माधुरी राऊत यांच्या खात्यावरुन वर्षा राऊत यांच्या खात्यावर वळवण्यात आली. वर्षा राऊत या संजय राऊत यांच्या पत्नी आहेत. वर्षा यांनी ही रक्कम दादरमधील फ्लॅट घेण्यासाठी वापरल्याचा दावा ईडीने केला. मध्यंतरी राऊत यांनी 55 लाख रुपये भरले असल्याचा दावा केला होता. तेव्हापासून राऊत यांची ईडीकडून चौकशी सुरू आहे.
Published by:Kiran Pharate
First published:

Tags: Ravi rana, Sanjay raut

पुढील बातम्या