मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /स्वतंत्र विदर्भासाठी दिल्लीत रणशिंग, जंतरमंतर मैदानात होणार हल्लाबोल आंदोलन

स्वतंत्र विदर्भासाठी दिल्लीत रणशिंग, जंतरमंतर मैदानात होणार हल्लाबोल आंदोलन

स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एल्गार, दिल्लीत होणार हल्लाबोल आंदोलन

स्वतंत्र विदर्भासाठी पुन्हा एल्गार, दिल्लीत होणार हल्लाबोल आंदोलन

स्वतंत्र विदर्भ राज्य संदर्भातील आंदोलनासंदर्भात आज बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये विदर्भ आंदोलनाचे नेते एडवोकेट वामनराव चटप यांच्यासह युवा आघाडी विदर्भ प्रदेश समितीचे प्रमुख मुकेश मासुरकर सहभागी झाले होते.

नवी दिल्ली, 30 मार्च : वेगळ्या विदर्भा (Separate vidarbha)साठी येत्या 7 एप्रिल रोजी राजधानी दिल्लीत रणशिंग फुंकण्यात येणार (protest in Delhi) आहे. विदर्भाच्या सर्वांगीण विकासासाठी, नक्षलवादाला आळा घालण्यासाठी प्रदूषण व कुपोषण संपविण्यासाठी आणि बेरोजगारांच्या रोजगारासाठी एकच उपाय म्हणून स्वतंत्र विदर्भ राज्य स्थापन करण्याची गरज आहे, ही मागणी घेऊन जवळपास सहाशे कार्यकर्ते राजधानी दिल्लीत आंदोलन करणार आहेत.

राजधानी दिल्लीमध्ये स्वतंत्र विदर्भ राज्य संदर्भातील आंदोलनासंदर्भात आज बैठक आयोजित केली. या बैठकीमध्ये विदर्भ आंदोलनाचे नेते एडवोकेट वामनराव चटप यांच्यासह युवा आघाडी विदर्भ प्रदेश समितीचे प्रमुख मुकेश मासुरकर सहभागी झाले होते. सध्या संसदेच्या अर्थसंकल्पीय अधिवेशनाचा दुसरा टप्पा सुरू आहे. यादरम्यान संसदेवर हल्लाबोल करण्याकरिता करण्यात येणार आहे.

वेगळे विदर्भ राज्य झालेच पाहिजे या मागणीसह राष्ट्रीय महामार्गासाठी भूसंपादन केल्या जाणाऱ्या जमिनीच्या मोबदल्याचे कृषी जमिनीकरिता 20 टक्के आणि अकृषक जमिनीकरिता 60 टक्के दर कमी करण्याचा शासन निर्णय तात्काळ रद्द करावा, या प्रमुख दोन मागण्या या आंदोलनादरम्यान करण्यात येणार आहे.

वाचा : पुढील 2 दिवस अत्यंत महत्त्वाचे, राज्यावर घोंगावतय मोठं संकट

दिल्लीतील जंतर मंतर येथे हे आंदोलन होणार असून यासाठी असलेल्या सर्व परवानग्या समितीने घेतले आहे. या आंदोलनात 600 पेक्षा जास्त कार्यकर्ते विदर्भ आंदोलनासाठी एकत्र येणार असून या आंदोलनाच्या निमित्ताने गेल्या दोन वर्षापासून संथगतीने कार्यरत असलेली विदर्भ राज्य समिती पुन्हा एकदा गतिमान होण्यासाठी प्रयत्न करणार आहे.

विदर्भ राज्य झाल्याशिवाय विदर्भाचा विकास होणार नाही असा दावा समितीचा असून यासाठी हे आंदोलन करण्यात येत आहे असे समितीचे प्रमुख वामनराव चटप यांनी सांगितले. राजधानी दिल्लीत होणाऱ्या आंदोलनासाठी ज्येष्ठ पत्रकार प्रकाश पोहरे महिला आघाडी विदर्भ प्रदेश अध्यक्षा रंजना मांडे अर्थ तज्ञ डॉक्टर श्रीनिवास खांदेवाले अरुण भाऊ केदार हे आंदोलनाच्या तयारीसाठी जोरदार प्रयत्न करत आहेत. यानिमित्ताने पुन्हा एकदा आंदोलनात फोडण्याचा प्रयत्न विदर्भ आंदोलन समितीच्या वतीने करण्यात येत आहे.

First published:
top videos

    Tags: Delhi, Maharashtra News, Vidarbha