वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला फेकून मारले पंचिंग मशीन, फुटले डोके

वरिष्ठ अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला फेकून मारले पंचिंग मशीन, फुटले डोके

जिल्हा उम्मेद अभियानात ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या झालेला वाद विकोपाला गेला.

  • Share this:

बीड,5 फेब्रुवारी: जिल्हा उम्मेद अभियानात ऑफिसमध्ये वरिष्ठ अधिकारी आणि कर्मचारी यांच्या झालेला वाद विकोपाला गेला. यात अधिकाऱ्याने कर्मचाऱ्याला थेट पंचिंग मशीन फेकून मारले. यात कर्मचारी मुरहरी सावंत यांचे डोके फुटले आहे. मिळालेली माहिती अशी की, ही प्रकार दोन दिवसांपूर्वी घडला. मात्र, बुधवारी आरोपी अधिकाऱ्याच्या विरोधात शिवाजी नगर पोलिस स्टेशनमध्ये तक्रार दाखल करण्यात आली आहे.

मुजोर अधिकाऱ्याला निलंबित करा...

या प्रकरणात मारहाण करणारा मुजोर अधिकारी जिल्हा ऊम्मेद अभियान व्यवस्थापक बलबीर शंकर मुंडे यांना तत्काळ निलंबित करा, अशी मागणी पीडित कर्मचाऱ्याने केली आहे. ऑफिसमधील कामकाजावरून आरोपी बलबीर मुंडे आणि मुरहरी सावंत यांच्यात हमारी तुमरी झाली. यात मुंडे यांनी सावंत यांना पंचिंग मशीन फेकून मारले. यात सावंत यांचे डोके फुटले आहे. या जखमी कर्मचाऱ्यांवर जिल्हा रुग्णलयात उपचार सुरु आहेत.या अधिकाऱ्यांना विरोधात शिवाजी नगर पोलिस ठाण्यात गुन्हा दाखल करण्याची प्रक्रिया सुरु आहे. मारहाण करणाऱ्या अधिकाऱ्याने शिव्या देऊन जीवे मरण्याची धमकी दिल्याचा आरोप पीडित कर्मचाऱ्याने केला आहे. आधीपासून मानसिक त्रास व खालच्या भाषेत बोलणे, अडचणीत आणण्याची धमकी देणे, असाही आरोप अधिकाऱ्यावर करण्यात आला आहे. यामुळे आरोपीला अटक करुन न्याय मिळावा, अशी मागणी केली. या पंचिंगच्या प्रकरणाची चर्चा जिल्हाभरात होत आहे.

नागपूर पुन्हा हादरलं; मामा-भाचीची मृतदेह आढळलादुसरीकडे, नागपूरमध्ये दिवसेंदिवस गुन्हेगारीच्या घटनेत वाढ होत आहे. आज दुहेरी हत्याकांडामुळे नागपूर शहर हादरलं आहे. शहरातील सक्करदार पोलीस ठाण्याच्या हद्दीतील दत्तात्रय नगरमध्ये मामा आणि भाचीची हत्या करण्यात आल्याची धक्कादायक घटना समोर आली आहे.

मंजुषा जयंतराव नाटेकर(वय-55) आणि अशोक काटे (वय 70 मामा) अशी मृतांची नावं आहे. गेल्या काही दिवसांपासून नात्याने मामा असलेले अशोक काटे हे मृत मनीषा यांच्याकडे राहायला आले होते.

मंजुषा नाटेकर या भारतीय ज्ञानपीठ प्राथमिक शाळेत मुख्याध्यापिका होत्या. त्यांना एक मुलगा आहे. तो पुण्याला राहतो. मंजुषा नाटेकर यांचं घर गेल्या 3 दिवसांपासून बाहेरून बंद होतं. शनिवारी त्या शाळेत गेल्या होत्या. रविवारी सुट्टी असल्याने घरीच होत्या. त्यानंतर सोमवारपासून त्या घराबाहेर आल्याचं नसल्याचं शेजाऱ्यांच्या लक्ष्यात आलं. आज तिसऱ्या दिवशी घरातून दुर्गंधी यायला लागली. त्यामुळे घर उघडले असता दुहेरी हत्याकांड झाल्याचं समोर आलं.

घर उघडून आत गेल्यानंतर मंजुषा आणि अशोक काटे यांचा मृतदेह आढळून आला. शेजाऱ्यांनी याबद्दल पोलिसांना माहिती कळावली. त्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली.

मामा अशोक काटे यांची गळा घोटून तर मनीषा यांच्यावर धारदार शस्त्राने वार करून हत्या करण्यात आली. या प्रकरणानंतर मृतक मंजुषा यांचे पती जयंतराव नाटेकर हे दोन दिवसांपासून बेपत्ता आहेत. त्यामुळे संशयाची सुई ही पती जयंत नाटेकर यांच्यावर जात असल्याचं प्राथमिक माहिती पोलिसांनी दिली. या प्रकरणाचा पोलीस पुढील तपास करत आहे.

First Published: Feb 5, 2020 06:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading