Home /News /maharashtra /

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलासकाका पाटील यांचं निधन

काँग्रेसचे ज्येष्ठ नेते आणि माजी मंत्री विलासकाका पाटील यांचं निधन

विलासराव पाटील यांनी राज्याच्या सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते.

सातारा, 04 जानेवारी : राष्ट्रीय काँग्रेसचे (Congress) ज्येष्ठ नेते आणि कराड दक्षिण मतदार संघाचे सलग 35 वर्षे नेतृत्व केलेले माजी आमदार विलासकाका पाटील - उंडाळकर (Vilaskaka Patil Undalkar) यांचे उपचारादरम्यान  निधन झाले. ते 84 वर्षांचे होते. साताऱ्यात हॉस्पिटलमध्ये उपचार सुरू असताना त्यांनी अखेरचा श्वास घेतला. विलासराव पाटील  हे काँग्रेसच्या विचारधारेशी एकनिष्ठ असलेले नेते होते. कराडचा बालेकिल्ला त्यांनी कायम राखला होता. आघाडी सरकारच्या काळात  विलासराव पाटील यांनी कराड दक्षिण मतदारसंघातून आमदार म्हणून नेतृत्व केले. अभिमानास्पद! जिल्हा परिषदेची शाळा ते देशातील कोरोना लशीला परवानगी देणारे प्रमुख याच काळात त्यांनी सहकार,  दुग्धविकास, पशुसंवर्धन, मदत व पुनर्वसन खात्याचे कॅबिनेट मंत्री सुद्धा राहिले होते. विलासकाका उंडाळकर यांनी तब्बल 7 वेळा कराडमधून आमदार मधून निवडून येण्याचा करिष्मा केला होता. लॉकडाऊन पीडितांना’ टार्गेट करणारं load app रॅकेट उघड, 2 चिनी नागरिकांना अटक विलासराव पाटील यांनी राज्याच्या  सहकार, विधी व न्याय आणि दुग्धविकास विभागाचे मंत्री म्हणून कामकाज पाहिले होते. गेल्या काही दिवसांपासून त्यांच्यावर उपचार सुरू होते. उंडाळकर यांच्या पार्थिवावर आज (सोमवारी) त्यांच्या कराड तालुक्यातील उंडाळे या गावी अंत्यसंस्कार करण्यात येणार आहेत. त्यांच्या निधनामुळे कराडवर शोककला पसरली आहे.
Published by:sachin Salve
First published:

पुढील बातम्या