मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

पालघर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, तिरंगा लावताना घरावरून पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

पालघर : स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव, तिरंगा लावताना घरावरून पडून ज्येष्ठ नागरिकाचा मृत्यू

यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होत तिरंगा लावण्यासाठी एक वृद्ध नागरिक घरावर चढले होते.

  • Published by:  News18 Desk
पालघर, 13 ऑगस्ट : सध्या देशाच्या स्वातंत्र्याच्या अमृत महोत्सवाच्या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ या उपक्रमाचे आव्हान पतंप्रधान नरेंद्र मोदी यांनी केले आहे. त्यामुळे हर घर तिरंगा ही मोहीम प्रत्येक गावात, प्रत्येक ठिकाणी राबविली जात आहे. मात्र, या उपक्रमादरम्यान, एक दु:खद बातमी समोर आली आहे. काय आहे संपूर्ण बातमी - यंदा भारत स्वातंत्र्याचा अमृत महोत्सव साजरा करत आहे. या निमित्ताने ‘हर घर तिरंगा’ उपक्रमात सहभागी होत  घरावर तिरंगा लावण्यासाठी चढलेल्या एका जेष्ठ नागरिकाचा मृत्यू झाल्याची घटना समोर आली आहे. ही घटना जव्हार तालुक्यातील राजेवाडी येथे घडली. लक्ष्मणभाऊ शिंदे (65) हे घरावर तिरंगा लावायला चढले होते. मात्र, त्याचवेळी छपरावरील कवले फुटली आणि त्यामुळे ते खाली कोसळले. या दुर्घटनेत त्यांचा मृत्यू झाला. लक्ष्मणभाऊ शिंदे हे महानगर टेलिफोन निगम लिमिटेड या कार्यालयातून सेवानिवृत्त झाले होते. शनिवार सकाळी सकाळी आठ वाजताच्या सुमारास ही घटना घडली. त्यांना जव्हार येथील उपजिल्हा रुग्णालयात त्यांना दाखल करण्यात आले होते. मात्र, त्यांना गंभीर स्वरूपाची दुखापत झाली होती. यामुळे नंतर नाशिक येथील सत्र रुग्णालयात हलविण्यात आले. याठिकाणी त्यांचा मृत्यू झाला. हेही वाचा - VIDEO : 'मराठीत बोललो तर चालेल ना?', इंग्रजीत भाषण सुरु असताना शिंदेंनी अचानक विचारलं आणि... पंतप्रधान नरेंद्र मोदी (PM Narendra Modi) यांनी ट्विटमध्ये म्हटलं होतं की, “यावर्षी आझादीचा अमृत महोत्सव साजरा करत असताना, हर घर तिरंगा आंदोलनाला बळ देऊया. 13 ते 15 ऑगस्ट दरम्यान तिरंगा फडकावा. या चळवळीमुळे राष्ट्रध्वजाशी आपला संबंध अधिक दृढ होईल. 13 ऑगस्ट रोजी सुमारे 30 कोटी घरांमध्ये राष्ट्रध्वज फडकवला जाईल, अशी सरकारची अपेक्षा आहे. यापूर्वी 2009 मध्ये उद्योगपती नवीन जिंदाल यांनी सरकारला निवेदन दिल्यानंतर सरकारनं तिरंगा झेंडा विविध ठिकाणी
First published:

Tags: Death, Palghar

पुढील बातम्या