नाराज एकनाथ खडसे झाले भावुक म्हणाले, माझा गुन्हा तरी काय?

' चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला असं वागविले गेलं या बाबत मी माझ्या श्रेष्ठींना विचारणार आहे की माझा गुन्हा काय.'

News18 Lokmat | Updated On: Oct 1, 2019 10:08 PM IST

नाराज एकनाथ खडसे झाले भावुक म्हणाले, माझा गुन्हा तरी काय?

इम्जियाज अहमद, 01 ऑक्टोंबर, मुक्ताईनगर : भाजपचे जेष्ठ नेते एकनाथराव खडसे  यांनी आज आपला उमेदवारी अर्ज  भरला असला तरी भाजपने जाहीर केलेल्या यादीत त्यांचं उमेदवार म्हणून नाव नसल्याने ते नारजा आहेत. नाराज झालेल्या खडसेंनी आपल्या कार्यकर्त्यांच्या समोर आपल्या भावनांना आज वाट मोकळी करून दिली. ते म्हणाले, गेली चाळीस वर्ष आपण पक्षाशी प्रामाणिक राहिलो. इतर पक्षातून अनेकवेळा मंत्री पदापासून वेगवेगळी प्रलोभने आपल्याला आली मात्र आपण पक्षाची बांधिलकी कधीही सोडली नाही. मात्र गेल्या काही वर्षात सतत आपली उपेक्षा केली गेली. हे सगळं करून झाल्या नंतर बाहेरच्यांच्या आरोपांवरून कोणतीही चूक नसताना आपल्याला  तीन वर्षांच्या पासून मंत्री पदावरून दूर केलं गेलं.

राज ठाकरें म्हणाले चंद्रकांत पाटीलां विरोधात लढा, भाजपच्या आमदाराचा गौप्यस्फोट

भोसरी जमीन प्रकरणात आणि दाऊद च्या बायकोशी बोलण्या प्रकरणात विनाकारण आपल्यावर आरोप झालेत. चौकशीत काहीही आलं नाही. या घटनात आपल्यावरील आरोप कोणी सिद्ध करून दाखविल्यास आपण राजकारणातून संन्यास घेऊ असं खडसे यांनी म्हटलंय. आपल्याला तिकीट मिळो अथवा न मिळो जनता आपल्या पाठीशी असल्याचा दावा खडसे यांनी केलाय. गेली चाळीस वर्ष जनतेने साथ दिल्यामुळेच आपण आज इथपर्यंत पोहोचलो असल्याने सांगत खडसे यांनी जनतेचे आभार मानले.

भाजपच्या खेळीमुळे पुण्यात सेना 'उणे', कार्यालयाला टाळं लावून 'मातोश्री'वर!

पुढील काळात देखील साथ जनतेने द्यावी असं भावनिक आवाहन देखील खडसे यांनी यावेळी केलं. यादीत नाव नसल्याने  निराश झालेल्या खडसेंनी म्हटलं आहे की चाळीस वर्ष आपण प्रामाणिकपणे काम करून आपल्याला असं वागविले गेलं या बाबत मी माझ्या श्रेष्ठींना विचारणार आहे की माझा गुन्हा काय ते तरी सांगावं असं म्हणत खडसे यांनी उपस्थित जनतेचे आभार मानले.

Loading...

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 1, 2019 10:06 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...