एकनाथ खडसे आक्रमक, आत्मचरित्र लिहून उघड करणार स्फोटक माहिती

एकनाथ खडसे आक्रमक, आत्मचरित्र लिहून उघड करणार स्फोटक माहिती

  • Share this:

राजेश भागवत, जळगाव 28 ऑक्टोंबर : गेल्या काही वर्षांपासून भाजपमध्ये एकाकी पडलेले ज्येष्ठ नेते एकनाथ खडसे आक्रमक झाले आहेत. विधानसभा निवडणुकीत रोहिणी या त्यांच्या मुलीचा पराभव झाल्याने ते दुखावले असून त्यांचा आक्रमकपणा वाढलाय. आता आत्मचरित्र लिहून स्फोटक माहिती  उघड करणार असल्याते संकेत त्यांनी दिले आहेत. गेल्या 40 वर्षांचा राजकारणाचा अनुभव पाठीशी आहे. अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे. त्यामुळे जगाला माहिती नसलेल्या अनेक घटनांचा मी साक्षीदार आहे त्या सर्व घटना जगासमोर मांडणार असल्याचा इशारा त्यांनी दिलाय.

शिवसेनेचे आमदार मुख्यमंत्र्यांच्या संपर्कात? सत्तेसाठी भाजपचा 'प्लान-B'तयार

जळगावमध्ये आलेले खडसे यांनी पत्रकार परिषद घेऊन आपल्या भावना व्यक्त केल्या. ते म्हणाले, राजकारणाचा 40 वर्षांचा अनुभव मला आहे. अनेक घडताना, बिघडताना पाहिल्या आहेत. तो अनुभव वाया जावू नये असं वाटतं. त्यामुळेच आत्मचरित्र लिहून त्यात या घटना मांडणार आहे. त्यात 23-30 अशा घटना असतील त्या कुणालाही माहित नाही असंही त्यांनी सांगितलंय. हे सांगतानाच त्यांनी आपलं दु:खही व्यक्त केलं.

ते म्हणाले, मला का तिकीट नाकारण्यात आलं त्याचा जाब आता मी पक्षश्रेष्ठींना विचारणार आहे. जळगावातील मधील मुक्ताई बंगल्यावर त्यांनी पत्रकारांशी संवाद साधत अनेक गोप्यस्फोटही केलेत.

पराभव झाल्यानंतरही पंकजा मुंडे होणार मंत्री?

शिवसेनेचे नेते सुरेश जैन यांना मुख्यमंत्री बनवा हे सांगण्यासाठी आपण बाळासाहेब ठाकरेंकडे कडे गेलो होतो, मात्र बाळासाहेबांनी सुरेश जैन हे व्यापारी असल्यामुळे त्यांच्या हातात सत्ता देण्यास नकार दिला होता. त्यावेळेस बाळासाहेबांची उंची आपल्याला कळली असे खडसे म्हणाले. महाराष्ट्राच्या मुख्यमंत्री पदाबद्दल बोलताना खडसे म्हणाले की मुख्यमंत्र्यांनी सांगितलं आहे तेच ठरलेलं आहे आणि तेच होणार आहे आणि मुख्यमंत्री पुन्हा देवेंद्र फडणवीस होणार आहेत.

फ्लॅट जप्ती प्रकरणावर धनंजय मुंडेंचा खुलासा!

खडसे म्हणाले, आपण सरकार विरोधी स्टेटमेंट कधीच केलं नाही मात्र आपली वक्तव्य हे अर्धी तोडून मोडून दाखवली गेली असा आरोपच खडसे यांनी केला. आपल्याला पक्षाकडून न्याय अपेक्षित आहे असेही खडसे म्हणाले. आपल्याबद्दल पक्षाची भूमिका ही विचारांच्या पलीकडे आहे मात्र पण पक्षाला याबद्दल विचारणार आहोत. पक्षाला तर म्हातारा झालो आहे असं पक्षाला वाटलं तर सगळं सोडून आपण घरी नातवंडांसोबत बसूं असंही त्यांनी सांगितलं. आपल्या अनुभवापेक्षा विखे-पाटलांसारख्या विरोधी पक्षातले अनुभवी लोक पक्षांमध्ये असल्याने त्यांचे अनुभव पक्ष्याला महत्त्वाचे वाटले असावे असा टोलाही त्यांनी लगावला.

चिदंबरम यांची प्रकृती बिघडली, रुग्णालयात दाखल

मुख्यमंत्र्यांनी आपल्याला पुन्हा मंत्रिमंडळात घेऊ असे जाहीर केले होते मात्र सांगायच्या गोष्टी वेगळ्या असतात आणि आतल्या गोष्टी वेगळ्या असतात असा टोला देखील या वेळेस त्यांनी लगावला.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 28, 2019 07:54 PM IST

ताज्या बातम्या