सेना-भाजपचं नातं हा नासाच्या संशोधनाचा विषय -धनंजय मुंडे

सेना-भाजपचं नातं हा नासाच्या संशोधनाचा विषय -धनंजय मुंडे

आशिष देशमुख सारखे अनेकजण भाजप सोडणार आहे फक्त थोडी वाट पहा असंही धंनजय मुंडे म्हणाले.

  • Share this:

08 जानेवारी : शिवसेना आणि भाजपातील नातं हा नासाच्या शास्त्रज्ञांच्या संशोधनाचा विषय आहे अशी उपरोधिक टीका विधान परिषदेचे विरोधी पक्षनेते धनंजय मुंडे यांनी केली.

भाजपा मधील बंडखोरीवर धंनजय मुंडे यांनी प्रतिक्रिया व्यक्त केली. नाना पटोले आणि आशिष देशमुख सारखे अनेकजन भाजप  सोडणार आहे फक्त थोडी वाट पहा असंही धंनजय मुंडे म्हणाले.

तसंच भाजप आणि सेनेत दोघांमध्ये गुळाचं आणि मुंगळ्याचे नाते आहे त्यांच्यात काहीच होणार नाही. मूळ प्रश्नावरुन लोकांचे लक्ष विचलीत करण्यासाठी त्यांचे हे नाटक असल्याची टीकाही धनंजय मुंडेंनी केली.

येत्या 16 तारखेपासून हल्लाबोल यात्रेला तुळजापुरहुन सुरुवात होणार असल्याची माहितीही धनंजय मुंडे यांनी दिली. तर 3 तारखेला विभागीय आयुक्त कार्यालय औरंगाबाद येथे मोर्चा काढून या हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. मराठवाड्यातील 8 जिल्ह्यातून 27 तालुक्यातून ही यात्रा जाणार आहे. शरद पवारांच्या उपस्थितीत हल्लाबोल यात्रेचा समारोप होणार आहे. सरसकट कर्जमाफी, हमीभाव, कापूस उत्पादक शेतकऱ्यांना मदत, तेलंगणाच्या धर्तीवर शेतकऱ्यांना 24 तास मोफत वीज या प्रमुख मागन्यांसाठी हल्लाबोल यात्रा काढली जाणार असल्याचं धनंजय मुंडे म्हणाले.

First published: January 8, 2018, 8:33 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading