शिवसेना-राष्ट्रवादी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढू शकते, अजितदादांचे संकेत

शिवसेना-राष्ट्रवादी मुंबई महापालिका निवडणूक एकत्र लढू शकते, अजितदादांचे संकेत

अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोस्ती आणि समन्वयाबद्दल आणखी एक विधान केलं आहे.

  • Share this:

मुंबई,1 मार्च,:राज्यात शिवसेनेच्या नेतृत्वाखाली काँग्रेस, राष्ट्रवादी यांचं महाविकास आघाडीचं सरकार सत्तारूढ झालं आहे. या सरकारला बघता बघता तीन महिने पूर्ण झाले. काही निर्णय सोडले तर या सरकारचं बरं सुरु आहे. शिवनेरीवर मुख्यमंत्री आणि शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे आणि उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी परस्परांचं कौतुक केलं होतं. रविवारी झालेल्या राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या मेळाव्यात उपमुख्यमंत्री अजित पवार यांनी मैत्रीमध्ये आणखी एक पाऊल पुढे टाकलं आहे. अजित पवार यांनी राष्ट्रवादी काँग्रेस आणि शिवसेनेच्या दोस्ती आणि समन्वयाबद्दल आणखी एक विधान केलं आहे. ते ऐकून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांच्या भुवया उंचावल्या. तर अजित पवार यांचं हे विधान ऐकून सर्वसामान्य शिवसैनिकांच्या चेहऱ्यावर प्रश्न आणि गोंधळाची स्थिती निर्माण झाल्याचं बोललं जातंय.

काय म्हणाले अजित पवार?

रविवारी मुंबईतल्या सोमय्या मैदानात राष्ट्रवादी काँग्रेसच्यावतीने कार्यकर्ता शिबीराचं आयोजन करण्यात आलं होतं. या शिबीरात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन करतांना अजित पवार यांनी मुंबईमध्ये राष्ट्रवादी काँग्रेस मजबूत करण्यासंदर्भात कार्यकर्त्यांना मार्गदर्शन केलं. पण यावेळी बोलता बोलता अजितदादांनी,'शिवसेना मुंबईत महापालिकत नंबर एक आहे. तर आपण फारच कमी आहोत. शिवसेनेला नंबर एक राहू दे आपण त्यांच्या बरोबरीने आपला नंबर वाढवू' असं म्हटलं. राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी याला टाळा वाजवून प्रतिसाद दिला. त्यासाठी राष्ट्रवादी काँग्रेस आतापासूनच तयारीला लागली आहे. मुंबई महापालिकेत राष्ट्रवादीचे नगरसेवक 8 वरुन 60 झाले पाहिजेत असंही अजितदादा म्हणाले. शिवसेना महानगरपालिकेत एक नंबरवर आहे. ती राहिलीच पाहिजे. परंतु, राष्ट्रवादी काँग्रेसही दुसऱ्या क्रमांकावर राहिली पाहिजे, असे अजितदादा पवार म्हणाले.

राष्ट्रवादी सोडून गेलेल्या नेत्यांवर बरसले अजित पवार

गेली पाच वर्षात सत्ता नव्हती तेंव्हाच्या कार्यकर्त्यांच्या तुलनेत आजच्या मेळाव्यात संख्या वाढली. सत्ता आल्यावर हे होते असते, असं सांगत अजित पवार यांनी जे पक्ष सोडून गेले त्यांच्यावर जोरदार टीका केली आहे. अजित पवार म्हटले की, 'राष्ट्रवादीचे माजी चार मुंबई अध्यक्ष पक्ष सोडून गेले. जे गेले सचिन अहिर, चित्रा वाघ, संजय पाटील आणि प्रसाद लाड, एक मायचा लाल थांबला नाही, सगळे गेले. असली माणसे आता नको. सत्ता नसली तरी जो राहिला त्याला मदत करा.' असं म्हणत अजित दादांनी एकप्रकारे सध्याचे अध्यक्ष नबाब मलिक यांच्यामागे कार्यकर्त्यांनी आपली ताकद उभी करावी असं आवाहन केलं.

अजितदादांना शेलारांचा टोला

उपमुख्यमंत्री आणि राष्ट्रवादीचे नेते अजित पवार यांनी पक्ष वाढ आणि शिवसेनेबरोबरच्या आघाडीबद्दल विधान करताच भाजपाचे नेते आणि आमदार आशिष शेलार यांनी राष्ट्रवादीला टोला लगावला आहे. राष्ट्रवादीचे नेते कोणी 50, कोणी 60 म्हणतात. पण आठ जागा जिंकल्या तरी खूप असं शेलार यांनी म्हटलं आहे. इतकंच नाही तर बेडुक फुगला तरी मोठा प्राणी होत नाही असं म्हणत राष्ट्रवादीची खिल्ली उडवली आहे असंही ते म्हणाले.

<blockquote class="twitter-tweet"><p lang="mr" dir="ltr">राष्ट्रवादीचे एक नेते म्हणतात 60 तर दुसरे म्हणतात 50 जिंकू...आहेत त्या 8 टिकल्या तरी खूप झाले. बेडूक कितीही फुगला तरी त्याला अन्य कोणताही प्राणी थोडं होता येत? ज्या पक्षाला मुंबईत अध्यक्ष मिळायची मारामारी ते निघाले पालिकेच्या मिशनवर..विनोदीच आहे सगळं!पालिकेत अबकी बार भाजपा सरकार!</p>&mdash; Adv. Ashish Shelar - ॲड. आशिष शेलार (@ShelarAshish) <a href="https://twitter.com/ShelarAshish/status/1234108362788343810?ref_src=twsrc%5Etfw">March 1, 2020</a></blockquote> <script async src="https://platform.twitter.com/widgets.js" charset="utf-8"></script>

होऊ शकते का अशी आघाडी?

अजित पवार यांनी राष्ट्रवादी आणि शिवसेनेच्या आघाडीचे संकेत दिले असले तरी ही आघाडी होण सोप नाही. याचं प्रमुख कारण म्हणजे राज्यासह अनेक ठिकाणी आता शिवसेने बरोबरच राष्ट्रवादी आणि काँग्रेसची सुद्धा आघाडी आहे. मग मुंबईत सुद्धा असा प्रयोग होण्याची शक्यता नाकारता येत नाही. असं झालं तर शिवसेनेच्या वाट्याच्या जागा कमी होऊ शकतात. यामुले अजितदादांची इच्छा पूर्ण होईल का हे पाहण्यासाठी अजून बराच काळ थांबावं लागेल.

First published: March 1, 2020, 9:49 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading