मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

मशिदी बंद करण्याचं सीरत कमिटीचं आवाहन, शुक्रवारची नमाझ घरीच पढण्याबाबत सूचना

मशिदी बंद करण्याचं सीरत कमिटीचं आवाहन, शुक्रवारची नमाझ घरीच पढण्याबाबत सूचना

पुण्यातील सीरत कमिटीनं मशिदी बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यातील सीरत कमिटीनं मशिदी बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

पुण्यातील सीरत कमिटीनं मशिदी बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे.

    पुणे,19 मार्च: कोरोना व्हायरसचा प्रार्दुभाव रोखण्यासाठी केंद्र तसेच राज्य सरकारने उपाययोजना केल्या आहेत. त्याच प्रमाणे काही कठोर निर्णयही घेतले आहेत. कोरोनाच्या भीतीमुळे मुंबई, पुण्यासह राज्यभरात संचारबंदी सदृश्य स्थिती आहे. राज्यभरातील मंदिरं तसेच धार्मिक स्थळे बंद करण्याचा निर्णय घेण्यात आला आहे. आता पुण्यातील सीरत कमिटीनं मशिदी बंद करण्याचं आवाहन करण्यात आलं आहे. महत्त्वपूर्ण म्हणजे शुक्रवारीचा नमाझ घरीच पढण्याबाबत मुस्लिम बांधवांना सूचना मौलाना निझामुद्दीन फखरुद्दीन आणि मौलाना अहमद कादरी यांनी दिल्या आहेत. हेही वाचा..कोरोनाव्हायरसचा उद्रेक! 2 आठवड्यांतच लाखो रुग्ण, धक्कादायक आकडेवारी समोर कोरोनामुळे महाराष्ट्रात 'देऊळ बंद' पण प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं घेतला अजब निर्णय दरम्यान, चीनमधून पसरलेल्या कोरोना व्हायरसने महाराष्ट्रात थैमान घातलं आहे. कोरोनाची लागण झालेल्या रुग्णांच्या संख्येत दिवसागणिक वाढ होत आहे. या व्हायरसने एकाचा बळी घेतला असून रुग्णांची संख्या 42 वर पोहोचली आहे. कोरोनाच्या पार्श्वभूमीवर राज्य सरकारने उपाययोजना सुरु केल्या आहेत. राज्यातील शाळा महाविद्यालये बंद करण्यात आली आहे. सर्व सार्वजनिक कार्यक्रम रद्द करण्यात आली आहेत. एवढेच नाही तर राज्यातील लहान-मोठी मंदिरे भाविकांसाठी बंद करण्यात आली आहे. असं असताना मुंबईतील प्रसिद्ध हाजी अली दर्गा ट्रस्टनं अजब निर्णय घेतला आहे. तो म्हणजे बंद न करण्याचा निर्णय घेतला आहे. मात्र, दर्ग्यावर येणाऱ्या भाविकांसाठी काही बंधनं घालण्यात आल्याची माहिती हाजी अली दर्गा ट्रस्टचे प्रशासकीय अधिकारी मोहम्मद अहमद ताहेर यांनी दिली आहे. हेही वाचा...Corona Virusची दहशत, शिंकला म्हणून बाईकस्वाराला दाम्पत्याने धो-धो धुतलं कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे. दर्गा आधी भाविकांसाठी दिवसभरात 10 ते 11 तास खुला ठेवण्यात येत होता. आता मात्र, केवळ 4 ते 5 तास खुला ठेवण्यात येणार आहे. नमाझ पठणासाठीही कमीत कमी भाविकांनी दर्ग्यावर यावे, असे आवाहन देखील ट्रस्टने केलं आहे. मोहम्मद अहमद ताहेर यांनी सांगितलं की, हाजी अली दर्ग्यावर दररोज 50 हजारांहून जास्त भाविक येतात. या पार्श्वभूमीवर दर्ग्याची स्वच्छता आणि भाविकांच्या सुरक्षिततेसाठी विशेष काळजी घेण्यात येत कोरोना व्हायरसच्या पार्श्वभूमीवर प्रत्येक एक तासानंतर दर्गा सेनिटाईज करण्यात येणार आहे. हेही वाचा...मुंबईत 22 वर्षीय तरुणीसह आणखी एका महिलेला कोरोनाची लागण, राज्यात आकडा 49वर दरम्यान, हाजी अली दर्ग्याची नोंद गिनीज बुक ऑफ वर्ल्ड रिकॉर्डनेही घेतली आहेत. येथे देश-विदेशातील हजारो नागरिक दररोज भेट देतात. त्यामुळे येथे मोठ्या प्रमाणात गर्दी होत असते. कोरोना व्हायरसची भीती असताना हाजी अली दर्गा बंद न ठेवण्याचा निर्णय ट्रस्टनं घेतला आहे, त्यामुळे सर्वत्र तर्कविर्तक मांडले जात आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Pune news

    पुढील बातम्या