मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Farmer Protest : शेतकऱ्यांची लुबाडणूक बोगस बियाणे खते विकणाऱ्यांवर कारवाई करूनही बियाणे, खते विक्री

Farmer Protest : शेतकऱ्यांची लुबाडणूक बोगस बियाणे खते विकणाऱ्यांवर कारवाई करूनही बियाणे, खते विक्री

शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर (farmers buying seeds) जात आहे परंतु बोगस बियाणे (bogus seeds) आणि रासायनिक खतांमुळे (chemical fertilizers) शेतकरी अडचणीत सापडत चालला आहे.

शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर (farmers buying seeds) जात आहे परंतु बोगस बियाणे (bogus seeds) आणि रासायनिक खतांमुळे (chemical fertilizers) शेतकरी अडचणीत सापडत चालला आहे.

शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर (farmers buying seeds) जात आहे परंतु बोगस बियाणे (bogus seeds) आणि रासायनिक खतांमुळे (chemical fertilizers) शेतकरी अडचणीत सापडत चालला आहे.

मुंबई, 13 जुलै : मागच्या एक महिन्यापासून पाऊस (sangli rain update) लाबंल्याने पेरणीसाठी शेतकऱ्यांना विलंब झाला आहे. (seeds selling bogus in sangli)दरम्यान शेतकरी बियाणे खरेदीसाठी कृषी केंद्रांवर (farmers buying seeds) जात आहे परंतु बोगस बियाणे (bogus seeds) आणि रासायनिक खतांमुळे (chemical fertilizers) शेतकरी अडचणीत सापडत चालला आहे. मागच्या तीन महिन्यांपासून खरीप हंगामात कृषी विभागाकडून (agriculture department) कारवाईचा धडाका सुरू आहे. खते, बियाणे, कीटकनाशके तपासण्याची मोहीम जोरदार सुरू आहे परंतु सांगली जिल्ह्यात कारवाई करूनही बोगस बियाणे खतांची विक्री सुरू आहे. यामुळे शेतकरी हवालदिल झाला आहे. (farmer protest)

सांगली जिल्ह्यात कृषी विभागाच्या 11 भरारी पथकाने अनेक ठिकाणी छापे टाकले. त्यात सदोष 30 लाखांचे बियाणे आणि खते जप्त केली आहेत. तपासणीत 330 नमुने दोषी आढळले असून, त्यातील 35 जणांवर न्यायालयात खटले दाखल करण्यात आलेले आहेत. कारवाईचा धडाका सुरू असूनही बोगस बियाणे, खते व कीटकनाशके विक्री सुरू आहे.

हे ही वाचा : राहुल गांधी पुन्हा परदेश दौऱ्यावर, काँग्रेसच्या उद्यापासूनच्या महत्त्वाच्या बैठकीला दांडी मारणार

कोल्हापूर, सांगली जिल्ह्यात खरिपासाठी मोठ्या प्रमाणात बियाणे, खते आणि कीटकनाशके यांची खरेदी होते. काही उत्पादक कंपन्या आणि विक्रेते शेतकऱ्यांची फसवणूक करतात. पेरणीच्या पार्श्वभूमीवर शेतकऱ्यांची फसवणूक होऊ नये यासाठी कृषी विभागामार्फत तपासणी करण्यासाठी 11 भरारी पथके स्थापन करण्यात आलेली आहेत. जिल्ह्यात 2 हजार 339 बियाणे विक्रेते, 2 हजार 984 खत विक्रेते आणि 2 हजार 488 कीटकनाशके विक्रेते आहेत. 

तपासणी पथकाने तीन महिन्यांत 2 हजार 223 बियाणे दुकानदार, 2 हजार 802 खते दुकानदार आणि 2 हजार 298 कीटकनाशके दुकानदार यांच्याकडे तपासणी केली. त्यात संशयास्पद आढळल्याने 230 बियाण्यांचे, 139 खतांचे तर 122 कीटकनाशकांचे नमुने तपासणीसाठी घेण्यात आले. तपासणी केलेल्या नमुन्यात पंधरा बियाण्यांचे, अठरा खतांचे तर दोन कीटकनाशकांचे नमुने दोषी आढळलेले आहेत.

हे ही वाचा : Maharashtra Water Crisis : राज्यात पावसाचे थैमान परंतु शेकडो गावांना पाणी टंचाई, टँकरने तहान भागवली जातेय

दोषी बियाणे आढळल्याने एकशे पाच क्विंटल जप्त करण्यात आले. त्याची किंमत 23 लाख 53 हजार रुपये होते. सधन समजल्या जाणाऱ्या वाळवा तालुक्यात ही कारवाई करण्यात आली. त्याशिवाय 40 क्विंटल बोगस खते जप्त करून साडेसात लाखांचा मुद्देमाल जप्त करण्यात आला. मणेराजुरी येथेही कारवाई करण्यात आली. या दोन उत्पादक कंपन्या विरोधात पोलिस ठाण्यात गुन्हे दाखल करण्यात आले आहेत.

First published:
top videos

    Tags: Farmer, Farmer protest, Sangli, Sangli (City/Town/Village), Sangli news