एसटी डेपोत तुफान राडा, कर्मचाऱ्यांकडून सुरक्षारक्षकाला लाठ्याकाठ्यांनी बेदम मारहाण

  • Share this:
    औरंगाबाद, 22 नोव्हेंबर: महाराष्ट्र राज्य परिवहन महामंडळ ( Maharashtra State Transport Corporation) सध्या या ना त्या कारणामुळे चर्चेत आहे. त्यात औरंगाबाद (Aurangabad) जिल्ह्यातील सोयगाव एसटी डेपोमध्ये (Soygaon ST Depot) तुफान राडा झाल्याची माहिती समोर आली आहे. एसटीच्या काही कर्मचाऱ्यांनी आगाराच्या प्रवेशद्वारावर कर्तव्यावर असलेल्या सुरक्षारक्षकाला (Security Guard Beaten) लाठ्या काठ्यांनी बेदम मारहाण केली. आज, रविवारी सकाळी हा धक्कादायक प्रकार घडला. याप्रकरणी पाच एसटी कर्मचाऱ्यांविरुद्ध सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. हेही वाचा... एसटी कर्मचाऱ्यांच्या मारहाणीत सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण (वय-37) हे गंभीर जखमी झाले आहेत. त्यांना पुढील उपचारासाठी जळगाव येथे हलवण्यात आलं आहे. पोलिसांनी दिलेली माहिती अशी की, सोयगाव एसटी डेपोच्या प्रवेशद्वारावर सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण हे कर्तव्य बजावत असताना वाहक प्रभू चोपडे, परमेश्वर शिंगाडे, विजय श्रीरामे व चालक रघुनाथ बारी, राजेंद्र भोपे हे पाच जण सकाळी 7 वाजता डेपोत आले. स्थानकप्रमुख कैलास बागुल यांच्या आदेशानुसार सुरक्षारक्षक राणीदास चव्हाण यांनी पाचही जणांना प्रवेशद्वारावर रोखलं. त्याचा राग आल्यानं पाचही जणांनी सुरक्षारक्षकावर प्राणघातक हल्ला केला. पाच जणांनी लाठ्याकाठ्यांनी सुरक्षारक्षकाला बेदम मारहाण केली. या मारहाणीत सुरक्षारक्षक गंभीर जखमी झाला आहे. त्याच्यावर सध्या जळगाव येथील रुग्णालयात उपचार सुरू आहेत. दरम्यान, पीडित सुरक्षारक्षकानं दिलेल्या तक्रारीवरून तीन वाहक आणि दोन चालक यांच्याविरुद्ध सोयगाव पोलीस स्टेशनमध्ये दंगलीचा गुन्हा दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे सोयगाव डेपो परिसरात तणाव निर्माण झाला होता. या प्रकरणाचा तपास प्रभारी पोलीस निरीक्षक किरण आहेर यांच्या मार्गदर्शनाखाली उपनिरीक्षक गीते, जमादार संतोष पाईकराव, सुभाष पाटील, रवींद्र तायडे, सागर गायकवाड करत आहेत. बस डेपोसह बसेसच तारण ठेवण्याच्या हालचाली सुरू दुसरीकडे, एसटी महामंडळ तोट्यात असताना राज्य कर्मचाऱ्यांची देणी, तसेच इतर प्रशाकीय खर्चासाठी महामंडळाने एसटी बस डेपो तसच एसटी बसेसच तारण ठेवण्याच्या हालचाली सुरू केल्या आहेत. राज्य एसटी महामंडळ यास कर्मचारी तसेच इतर देणे साधारण 1 हजार कोटींच्या घरात आहेत. एसटी कर्मचारी आर्थिक परिस्थिती बिकट होत आहे. कर्मचारी पगार करण्यास निधी नाही, अशी सध्या स्थिती आहे. त्यामुळे महामंडळाने कर्ज काढण्याच्या हेतूनं हालचाली सुरू केल्या आहेत. कर्ज कापताना तारण काही तरी ठेवावं लागेल. त्यामुळे एसटी महामंडळाच्या मुख्य जागा डेपो, काही एसटी बसेस तारण म्हणून ठेवण्याच्या हालचाली सुरू आहेत. या गोष्टी तारण ठेवत त्यामाध्यमातून सुमारे दोन हजार कोटी कर्ज काढण्याचा विचार आहे. तुर्तास प्रशासकीय पातळींवर याबाबत हालचाली सुरू असून राज्य सरकारकडे ही किमान 1 हजार कोटी रूपये मागणी केली. हेही वाचा... राज्य शासनाने एसटी महामंडळ निधी दिल्यास कर्ज काढण्याची गरज लागणार नाही. पण जर शासनाकडून निधी मिळाला नाही तर मात्र एसटी महामंडळाला कर्ज काढण्याशिवाय पर्याय उपलब्ध राहणार नाही, असं एसटी महामंडळातील उच्च प्रशासकीय अधिकाऱ्यानं सांगितलं आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published: