साईंच्या दरबारात प्रामाणिकपणाचं दर्शन, सुरक्षा रक्षकाच्या कामाला तुम्हीही कराल सलाम

साईंच्या दरबारात प्रामाणिकपणाचं दर्शन, सुरक्षा रक्षकाच्या कामाला तुम्हीही कराल सलाम

साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे मोठे कौतूक होते आहे.

  • Share this:

हरिष दिमोटे, प्रतिनिधी

शिर्डी, 15 एप्रिल : रस्त्यावर साधी 10 रुपयाची नोट जरी दिसली तरी आपण ती उचलून खिशात घालतो पण शिर्डीमध्ये मात्र प्रामाणिकपणाचं जिवंत उदाहरण समोर आलं आहे. शिर्डीतल्या साईमंदिराच्या सुरक्षा रक्षकाने सापडलेले 1 लाख 67 हजार रुपये परत केले आहेत. त्याच्या या खरेपणामुळे सर्व स्तरातून त्यांचं कौतुक होत आहे.

रामनवमीनिमित्त शिर्डीमध्ये भक्तांचा जनसागर लोटला होता. यावेळी गुजरातच्या येथून देवदर्शनासाठी एक ग्रुप सोमवारी सकाळी शिर्डीत साईबाबांच्या दर्शनासाठी दाखल झाला होता. तीर्थयात्रा आयोजीत करणाऱ्या अरूणाबेन हरीयाणी या महिलेकडे असणारी कापडी पिशवी दर्शनरांगेतील स्कॅनिंग मशिनमध्ये त्यांनी टाकली. मात्र, घाईगडबडीत दर्शनासाठी त्या तशाच निघून गेल्या.

त्यावेळी ड्युटीवर असणाऱ्या सुरक्षा कर्मचाऱ्यांनी पिशवी कुणाची आहे याची शहानिशा केली असता त्यात 1 लाख 67 हजाराची रोकड मिळून आली. सुरक्षा रक्षकांनी भक्ताची शोधाशोध करत साईभक्ताला ही रक्कम आणि पिशवी इमानदारीने परत केली आहे.

तीर्थयात्रा करण्यासाठी निघालेल्या भक्तांच्या खर्चासाठी जवळ ठेवलेले पैसे हरवल्याने या भक्तांची मोठी अडचण झाली होती. मात्र, साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे हरवलेले पैसे त्यांना परत मिळाले.

साई संस्थानच्या कर्मचाऱ्यांनी दाखवलेल्या प्रामाणिकपणामुळे त्यांचे मोठे कौतूक होते आहे. संस्थानच्या सुरक्षा प्रमुखांनी आणि भक्तांनी त्यांच्या या प्रामाणिकपणाचा सन्मान केला आहे.

धक्कादायक! टोल नाक्यावर गाडी अडवल्यानं कर्मचाऱ्याला 8 किमी फरफटत नेलं

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

Tags: sai baba
First Published: Apr 15, 2019 02:32 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading