कोरोनाचा धोका वाढल्यानंतर पुण्यात कलम 144 लागू होण्याची शक्यता

कोरोनाचा धोका वाढल्यानंतर पुण्यात कलम 144 लागू होण्याची शक्यता

शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे.

  • Share this:

पुणे, 15 मार्च : महाराष्ट्रात सर्वाधिक कोरोना पॉझिटिव्ह रुग्ण पुण्यात आढळले आहेत. कोरोनाबाधित रुग्णांच्या संपर्कात आल्यानंतर हा व्हायरस वेगाने पसरू शकतो. शहरात या व्हायरस अजून पसरू नये, म्हणून प्रशासनाकडून खबरदारी घेण्यात येत आहे. या पार्श्वभूमीवर पुणे शहरातील काही भागांमध्ये जमावबंदी लागू होऊ शकते.

पुण्यातील जमावबंदीबद्दल अद्याप कोणतेही आदेश देण्यात आलेले नाहीत. मात्र आवश्यकता भासल्यास हा निर्णय घेण्यात येऊ शकतो, अशी माहिती प्रशानाकडून पत्रकार परिषदेत देण्यात आली आहे.

दरम्यान, 'पुण्यात कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची संख्या 15 वर पोहोचली आहे. गेल्या चोवीस तासात पाच नवीन रुग्ण ऍडमिट करण्यात आले आहेत. काल पाच जण कोरोना पॉझिटिव्ह आढळले, त्याबद्दल आम्हाला चिंता आहे. कारण ते कुठेही परदेशात गेले नव्हते. पण त्यांचा एक नातेवाईक कोरोना पॉझिटिव्ह होता. त्याच्या संपर्कात आल्यामुळे हे पाच जणही कोरोना बाधित झाले,' अशी माहिती पुण्यात घेतलेल्या पत्रकार परिषदेत विभागीय आयुक्त दीपक म्हैसेकर यांनी दिली आहे.

हेही वाचा- कोरोनो संशयित जोडपे सार्वजनिक कार्यक्रमात झाले सहभागी, लोकांच्या पोटात भीतीचा गोळा

'पुण्यात 57 जण ऍडमिट आहेत. NiV 315 सॅम्पल पाठवले होते. त्यातील 294 रिपोर्ट प्राप्त झाले. यातील 15 जण वगळता बाकी निगेटिव्ह आहेत. त्यामुळे आत्तापर्यंत पुण्यात 15 कोरोनाबाधित रूग्ण आढळले असून त्यांच्यावर उपचार सुरू आहेत. काल आम्ही मॉलही बंद केले आहेत. फक्त त्यातील मेडिकल्स जीवनावश्यक वस्तूंचे स्टोअर्स सुरू राहतील. त्यामुळे लोकांनी घरं सोडू नयेत, ही कळकळीची विनंती, शासन आदेशाचं पालन करावं,'असं आवाहन दीपक म्हैसेकर यांनी केलं आहे.

First published: March 15, 2020, 5:32 PM IST

ताज्या बातम्या