भाजपला आलाय सत्तेचा माज, संघर्ष यात्रेत बरसले अजित पवार

भाजपला आलाय सत्तेचा माज, संघर्ष यात्रेत बरसले अजित पवार

शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आज सुरू झाला.

  • Share this:

15 एप्रिल : शेतकरी कर्जमाफीसाठी सर्व विरोधी पक्षांच्या संघर्ष यात्रेचा दुसरा टप्पा आज सुरू झाला.राजमाता जिजाऊंचं जन्मस्थळ सिंदखेड राजामधून या यात्रेचा प्रारंभ झाला. आपल्या भाषणात अजित पवारांनी मुख्यमंत्र्यांवर कर्जमाफीच्या मुद्द्यावरून जोरदार टीका केली. मुख्यमंत्र्यांची अक्कल चालत नाही का? शेतकऱ्याचं दु:ख यांना दिसत नाही का? असं ते म्हणाले.

महाराजांच्या पुण्यतिथीला भाजपवाले बँड वाजवतात, इतका त्यांना सत्तेचा माज आलाय, अशा शब्दांत त्यांनी टीका केली. सिंदखेड राजानंतर ही यात्रा बुलडाणा, जळगाव, धुळे, नंदुरबार, नाशिक, पालघर, ठाणे या जिल्ह्यांमधून प्रवास करणार असून, १८ एप्रिलला शहापूरमध्ये दुसऱ्या टप्प्याचा समारोप होणाराय.

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Apr 15, 2017 02:37 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading