भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांना मोठा दणका, 'लोकमंगल'ची खाती सील

भाजपचे मंत्री सुभाष देशमुखांना मोठा दणका, 'लोकमंगल'ची खाती सील

गुंतवणुकदारांचे 74 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीने 16 मे 2018 रोजी दिले होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिले नाही.

  • Share this:

सोलापूर, 4 जानेवारी : गुंतवणुकदारांचे 74 कोटी रुपये परत करण्याचे सेबीचे आदेश न पाळल्याने सहकारमंत्री सुभास देशमुख यांना 'सेबी'ने चांगलाच दणका दिला आहे. सुभाष देशमुख यांच्या 'लोकमंगल'चे  म्युचल फंड आणि डी मॅट खाते सेबीकडून सील करण्यात आलं आहे. तसंच 74 कोटी रुपयांच्या वसुलीसाठी सुभाष देशमुख यांना नोटीसही बजावण्यात आली आहे.

गुंतवणुकदारांचे 74 कोटी रुपये 3 महिन्यात परत करण्याचे आदेश सेबीने 16 मे 2018 रोजी दिले होते. मात्र मागील सहा महिन्यांपासून लोकमंगलने सेबीच्या आदेशाला उत्तरच दिले नाही. त्यामुळे सेबीकडून ही कारवाई करण्यात आली आहे.

नक्की काय कारवाई केली?

-सुभाष देशमुख यांच्याशी संबंधित लोकमंगलची खाती गोठवण्याचा सेबीची नोटीस

- लोकमंगलचे डिमॅट खाते आणि म्युच्युअल फंडाची खाती गोठवण्याचे सेबीची नोटीस

- लोकमंगल अॅग्रो इंडस्ट्रीज लिमिटेड कंपनीबरोबरच, नोटीसमध्ये देशमुख यांच्या पत्नी स्मिता देशमुख, वैजनाथ लातूरे, औदुंबर देशमुख, शहाजी पवार, गुर्राना तेली, महेश देशमुख, पराग पाटील यांनाही नोटीस

VIDEO: मुंंबईजवळच्या एमआयडीसीत मोठी आग, स्फोटाच्या आवाजानं खळबळ

First published: January 4, 2019, 3:50 PM IST

ताज्या बातम्या