मतदार यादीत नाव आहे की नाही, हे कसं शोधाल? मतदानकेंद्राचीही मिळेल माहिती

एका क्लिकवर मतदान केंद्राची माहिती मिळवण्यासाठी आणि मतदार यादीत नाव शोधण्यासाठी काय करायचं?

News18 Lokmat | Updated On: Oct 17, 2019 08:55 PM IST

मतदार यादीत नाव आहे की नाही, हे कसं शोधाल? मतदानकेंद्राचीही मिळेल माहिती

मुंबई, 17 ऑक्टोबर : महाराष्ट्र विधानसभा निवडणुकीसाठी (Maharashtra assembly election 2019) सर्व यंत्रणा सज्ज झाल्या आहेत. सोमवारी  21 तारखेला संपूर्ण राज्यात इलेक्ट्रॉनिक यंत्राद्वारे मतदान (EVM) होणार आहे. 288 जागांसाठी होणाऱ्या या मतदानासाठी 1 लाख 79 हजार 895 मतदान यंत्र (बॅलेट युनिट)  आणि 1 लाख 26 हजार 505 नियंत्रण युनिट (Control units) सज्ज करण्यात आली आहेत. शिवाय 1 लाख 35 हजार 21 VVPAT  (व्होटर व्हेरिफायबल पेपर ऑडिट्रेल) यंत्रं पुरवण्यात आली आहेत.

यंत्रणा सज्ज

सोमवारी 21 ऑक्टोबरला (Maharashtra polling day) होणाऱ्या मतदानासाठी सरकारी कर्मचाऱ्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आलं आहे. 24 ऑक्टोबरला होणाऱ्या मतमोजणीची व्यवस्था (Counting day) वेगळी आहे. विधानसभा निवडणुकीसाठी सुमारे 6.50 लाख कर्मचाऱ्यांची नियुक्ती करण्यात आली आहे. त्यांना विशेष प्रशिक्षण देण्यात आले आहे. निवडणूक काळात कायदा व सुव्यवस्था राखण्यासाठी पोलीस दलही सज्ज आहे.

मतदान केंद्राची माहिती अशी मिळवा

•    मतदारांना मतदार यादीत नाव आहे की नाही याची माहिती एका क्लिकवर मिळू शकेल. भारतीय निवडणूक आयोगाच्या https://electoralsearch.in या वेबसाईटवर मतदान केंद्राबद्दल एका क्लिकवर माहिती मिळू शकेल.

Loading...

•    या वेबसाईटवर इथे क्लिक करा. स्वतःचे संपूर्ण डिटेल्स भरल्यानंतर तुमच्या नावाची  माहिती मिळते. मतदाराचं नाव, वडील/पतीचे नाव, वय अथवा जन्मतारीख, लिंग, राज्य, जिल्हा, विधानसभा मतदारसंघ या गोष्टी दिलेल्या कॉलममध्ये भरल्यानंतर माहिती मिळू शकते.

•  याशिवाय मतदार ओळख क्रमांक आणि राज्याचं नाव टाकल्यानंतर मतदारांची माहिती मिळविण्याचा दुसरा पर्यायही संकेतस्थळावर उपलब्ध आहे.

मतदानासाठी आवश्यक ओळखपत्र

मतदानासाठी मतदार यादीत नाव आवश्यक आहे. आपलं नाव यादीत असेल तरच मतदान करता येईल. मतदान ओळखपत्र दाखवलं तरी नाव नसेल तर मतदान केंद्रात प्रवेश मिळणार नाही. मतदार यादीत नाव असलेल्या मतदारांना ओळखपत्र सादर करणं बंधनकारक आहे. भारती निवडणूक आयोगाचं ओळखपत्र नसेल तर पुढील 11 प्रकारे आयोगाने ग्राह्य केलेल्या ओळखपत्रांच्या माध्यमातून मतदारास आपला हक्क बजावता येईल.

1.    पासपोर्ट (पारपत्र)

2.    वाहन चालक परवाना - Driving Licence

3. छायाचित्र असलेले कर्मचारी ओळखपत्र (राज्य/केंद्र शासन, सार्वजनिक उपक्रम,

सार्वजनिक मर्यादित कंपन्यांचे आयकार्ड)

4.    छायाचित्र असलेले बँकांचे/टपाल कार्यालयाचे पासबुक

5.    पॅनकार्ड (PAN card)

6.    राष्ट्रीय लोकसंख्या नोंदणी (नॅशनल पॉप्युलेशन रजिस्ट्रेशन) अंतर्गत महसूल निर्मिती

निर्देशांक (रेव्हेन्यू जनरेशन इंडेक्स) द्वारे दिलेले स्मार्टकार्ड

7.    मनरेगा जॉबकार्ड

8.    कामगार मंत्रालयाने दिलेले आरोग्य विमा स्मार्टकार्ड

9.    छायाचित्र असलेले निवृत्तीवेतन दस्तावेज

10.    खासदार/आमदार/विधानपरिषद सदस्य यांना दिलेले ओळखपत्र

11.    आधारकार्ड (Aadhar)

मतदारांच्या सुविधेसाठी

•    आचारसंहितेसंबंधात तक्रारी करण्यासाठी सी-व्हिजील ॲपची सुविधा उपलब्ध.

•    ईव्हीएम व्हीव्हीपॅट वाहतूक करणाऱ्या वाहनांच्या नियंत्रणाकरिता GPS Tracking App करण्यात आलं आहे.

•    मतदारांच्या मदतीसाठी व्होटर हेल्पलाईन 1950 हा आहे. 1950 या क्रमांकावर SMS करून मतदारांना माहिती मिळवता येईल.

•    मतदारांसाठी ‘व्होटर हेल्पलाईन ॲप’ ही सुरू करण्यात आलं आहे.

•    दिव्यांग मतदारांना मतदार नोंदणी करणं, मतदान केंद्राचा शोध घेणं, व्हीलचेअरची मागणी नोंदविणं यासाठी PwD ॲपची सुविधा.

चांद्रयान - 2 बद्दल चांगली बातमी, यानाने पाठवला चंद्राचा पहिला प्रकाशमान फोटो

मुलाला 'मोदी जी' म्हणायला शिकवतेय अभिनेत्री, VIDEO पाहून पंतप्रधान म्हणाले...

मोदींच्या सभेला गेलेल्या पोलिसांच्या गाडीला अपघात, मदतीला धावून आले धनंजय मुंडे

बातम्यांच्या अपडेटसाठी लाईक करा आमच्या फेसबुक पेजला आणि टि्वटरवर फाॅलो करा

First Published: Oct 17, 2019 08:55 PM IST
Loading...

ताज्या बातम्या

Loading...