रत्नागिरीत समुद्रकिनारी निळ्या लाटा !

रत्नागिरीत समुद्रकिनारी निळ्या लाटा !

  • Share this:

09 फेब्रुवारी : समुद्र किनारी जर निळ्या लाटा आल्यातर...होय रत्नागिरीकरांनी "याची देही याची डोळा..." असा अनोखा प्रसंग डोळ्यात साठवला.

रत्नागिरीच्या समुद्र किनारी लोकांना गुरुवारी रात्री अद्भुत नजारा अनुभवायला मिळाला. समुद्रकिनारी निळ्या लाटा उसळल्या.  शहराच्या भाट्ये मांडावी समुद्र किनारी लाटांचा हा अद्भुत नजारा पाहायला मिळत असल्याचं कळताच अनेकांनी हे दृश्य अनुभवण्यासाठी समुद्र किनारी एकच गर्दी केली.

गेल्या वर्षी सुद्धा रत्नागिरीच्या वेगवेगळ्या समुद्र किनाऱ्यावर रात्रीच्या वेळी ही अद्भुत दुनिया अनुभवायला मिळाली होती.

First published: February 9, 2018, 11:12 PM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading