मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

परभणीत स्कॉपिओ गाडी पाण्यात गेली वाहून, गावकऱ्यांनी वाचवला 7 जणांचा जीव, VIDEO

परभणीत स्कॉपिओ गाडी पाण्यात गेली वाहून, गावकऱ्यांनी वाचवला 7 जणांचा जीव, VIDEO

 पाथरी तालुक्यात पाच तासांमध्ये 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कासापूरी हादगाव महसूल मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे.

परभणी, 31 ऑगस्ट : मराठवाड्यात (marathwada) पावसाने दमदार हजेरी लावली आहे. त्यामुळे नद्या नाले तुटुंब भरून वाहत आहे. परभणीमध्ये (parbhani) पावसाने धुमशान घातले असून पाथरी तालुक्यात गुंज महामार्गावर एक स्कॉर्पिओ गाडी (  Scorpio car sank) वाहून केली आहे. या गाडीत सात प्रवासी होते. गावकऱ्यांनी सर्व प्रवाशांना सुखरुप वाचवले आहे.

पाथरी तालुक्यातील केकर जवळा ते गुंज महामार्गावर आज रात्री एका स्कार्पिओ गाडी वाहून गेली आहे. या गाडीत एकूण सात प्रवाशी असल्याची माहिती समोर आली. प्रवाशांनी आरडाओरडा केल्यानंतर गावकरी मदतीला धावून आले. सर्व प्रवाशांना बाहेर काढण्यात आलं. परिसरातील गावकऱ्यांनी सर्व प्रवाशांचे प्राण वाचवले आहे. त्यामुळे मोठा अनर्थ थोडक्यात टळला आहे. पण, गाडी मात्र पाण्यात वाहून गेली आहे.

दरम्यान, जिल्ह्यातील पाथरी तालुक्यात पाच तासांमध्ये 88 मिलिमीटर पावसाची नोंद झाली असून कासापूरी हादगाव महसूल मंडळांमध्ये ढगफुटी सदृष्य पाऊस झाला आहे. हादगाव महसूल मंडळांमध्ये 130 मिलिमीटर, तर कासापुरी मंडळांमध्ये 106 मिलिमीटर पावसाची नोंद झाली आहे.

फूटबॉलचं मैदान झालं Romantic! मॅनेजरने केलं गर्लफ्रेंडला प्रपोज, टीमने केली मदत

झालेल्या या पावसामुळे परिसरातील शेतांमध्ये पाणी घुसले असून उभ्या पिकांचे नुकसान झाले आहे. तर दुसरीकडे, तालुक्यातील बंधारे पूर्णपणे भरले असून या बंधाऱ्यांमधून पाण्याचा मोठ्या प्रमाणात विसर्ग सुरू करण्यात आलेला आहे.

यामुळे गोदावरी नदीकाठी असलेल्या शेतांमध्येही, पाणी घुसू लागले आहे. एकूणच तालुक्यात झालेल्या अतिवृष्टी नंतर परिस्थिती गंभीर बनली असून पाथरीच्या तहसीलदार यांनी शेतांची पाहणी सुरू केली आहे. तर लवकरच पंचनामे करून, याचा रिपोर्ट देण्यात येईल, माहितीही देण्यात आली आहे.

First published: