रस्त्याचे काम सुरू असल्याने रस्ता खालीवर होता. त्यामुळे नेमका अंदाज न आल्यामुळे स्कुटी स्लिप झाली. निकिताच्या अपघाती मृत्यूनंतर पासदगावमध्ये हळहळ व्यक्त करण्यात येत आहे. बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांची सरपंचाला बेदम मारहाण बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्याची गुंडगिरी पाहण्यास मिळाली आहे. सामाजिक न्याय मंत्री धनंजय मुंडे यांच्या कार्यकर्त्याने सरपंच पांडुरंग यांना बेदम मारहाण केली. या मारहाणीचा व्हिडिओ व्हायरल झाला आहे. पाटोदा रोहतवाडी गावचे सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी बेदम मारहाण केली आहे. भाजपचे काम का करतो, असा जाब विचारून राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी खुर्ची आणि लाथा बुक्क्यांनी बेदम मारहाण केली. मारहाण करणाऱ्या कार्यकर्ते हे धनंजय मुंडे यांचं समर्थक असल्याचा आरोप पांडुरंग नागरगौजे यांनी केला आहे.नांदेडमध्ये खराब रस्त्यामुळे स्कुटी स्लिप झाली आणि तरुणी ट्रकखाली सापडली #VIDEO pic.twitter.com/oJZyh8d78N
— News18Lokmat (@News18lokmat) January 22, 2020
धनंजय मुंडे यांच्याबद्दल चुकीची पोस्ट टाकली होती म्हणून मारहाण करण्यात आली असा दावाही या कार्यकर्त्यांनी फेसबुक पोस्ट टाकून केला. तसंच फेसबुकवर पोस्ट टाकून सरपंच पांडुरंग नागरगौजे यांना धमकीही देण्यात आली. 'धनंजय मुंडे यांच्याबद्दल बोलायची लायकी नाही. लायकीनुसार बोलं नाहीतर थेट 302 करण्याची धमकी देण्यात आली.बीडमध्ये राष्ट्रवादीच्या कार्यकर्त्यांनी केली सरपंचाला बेदम मारहाण pic.twitter.com/OlzX1wEA5W
— News18Lokmat (@News18lokmat) January 22, 2020
मराठी बातम्या, ब्रेकिंग न्यूज मराठीत सर्वात आधी News18 लोकमतवर. आजच्या ताज्या बातम्या, लाइव्ह न्यूज अपडेट, सर्वात आधी वाचा विश्वासार्ह मराठी न्यूज वेबसाइट News18 लोकमतवर.