ठाणे, 20 नोव्हेंबर: मुंबईप्रमाणे (Mumbai)ठाणे जिल्ह्यातील (Thane District) शाळाही (School) 31 डिसेंबरपर्यंत बंद ठेवण्याचे आदेश ठाण्याचे पालकमंत्री एकनाथ शिंदे (Eknath Shinde) यांनी ठाणे जिल्हाधिकारी राजेश नार्वेकर (Collector Rajesh Narvekar) यांना दिले आहेत. सेामवारपासून (23 नोव्हेंबर) नववी ते बारावीचे वर्ग सुरू होणार होते, आता मात्र नवीन वर्षातच शाळा सुरू होण्याची शक्यता आहे.
दिवाळीनंतर कोरोना रूग्णांची संख्या वाढताना दिसत आहे. त्यामुळेच खबरदारी म्हणून हा निर्णय घेण्यात आला आहे. ठाणे जिल्हयात ठाणे, नवी मुंबई, मीरा भाईंदर, केडीएमसी, भिवंडी उल्हासनगर या सहा महापालिका आणि अंबरनाथ बदलापूर या नगरपालिकांचा समावेश आहे.
हेही वाचा...कार्तिकी वारीवरही निर्बंध! पंढरपुरात संचारबंदी तर वारकऱ्यांसह पालख्यांना बंदी
ठाणे जिल्ह्यात सर्वाधिक शाळा असून विद्यार्थ्यांची संख्या लाखोंच्या घरात आहे. ठाण्यात कोरोनाचे रूग्ण वाढताना दिसत आहे. शाळा बंद ठेवल्यानं त्यावर नियंत्रण राहील, असं पालकमंत्री एकनाथ शिंदे यांचं म्हणणं आहे. शालेय शिक्षण विभागाने सोमवार, 23 नोव्हेंबरपासून राज्यातील ९ वी ते 12 वी शाळा सुरू करण्याचा निर्णय घेतला. त्यादृष्टीने शाळांमध्ये साफसफाई, फवारणी, शिक्षकांची कोरोना चाचणी करण्यात येत होती. मात्र दिवाळीनंतर कोरोनाची दुसरी लाट येण्याची शक्यता शासन प्रशासनाकडून व्यक्त करण्यात आली होती. त्यातच दिवाळीनंतर कोरोना रूग्णांच्या संख्येत वाढ हेाताना दिसत आहे.
स्थानिक परिस्थिती बघून शाळा सुरू करण्याचा निर्णय घेण्यात यावा, असे शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रशासनाला निर्देश दिले आहेत. मुंबई महापालिकेचे आयुक्त इक्बाल चहल यांनी 31 डिसेंबरपर्यंत शाळा सुरू न करण्याचे आदेश दिले आहेत. त्याबरोबरच आता ठाणे जिल्हयातील शाळाही बंद राहणार आहेत.
शाळा सुरू करणे बंधनकारक नाही....
येत्या सोमवारपासून राज्यातील शैक्षणिक संस्थेतील नववी ते अकरावीचे वर्ग सुरू करण्याचा निर्णय शासनाने घेतला आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून सांगणार स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे हे ठरवून निर्णय घ्यावा. पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असं बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अॅटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे.
शाळा सुरू करत असताना स्थानिक प्रशासनाने योग्य ती खबरदारी घेऊनच शाळा सुरू कराव्यात. कोरोनाचा प्रादुर्भाव असलेल्या जिल्ह्य़ातील शाळा सुरू करत असताना स्थानिक जिल्हा अधिकारी, गट विकास अधिकारी व शिक्षण अधिकारी यांनी विचार विनिमय करूनच विद्यार्थ्यांचे आरोग्य व शैक्षणिक हित जपूनच निर्णय घ्यावा अशा सुचना देण्यात आलेल्या आहेत. या आदेशानुसार राज्यातील शाळा सुरू होण्याच्या दृष्टीने स्थानिक प्रशासनाचा निर्णय महत्त्वपुर्ण ठरणार आहे.
हेही वाचा..अजित पवार पुन्हा नाराज? आणखी एका महत्त्वाच्या समितीचं सोडलं अध्यक्षपद
शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी या संदर्भात शिक्षण विभागातील अधिकाऱ्यांना योग्य त्या सुचना दिल्या आहेत. प्रत्यक्ष वर्ग सुरू झाले नाही तरी आँनलाईन शिक्षण पध्दती चालूच राहणार आहे. कोरोनाच्या महामारीच्या संकटात विद्यार्थी व शिक्षकांचे आरोग्य जपण्यासाठीच शिक्षण विभागाने हा निर्णय घेतला असल्याचे शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी प्रसारमाध्यमांना सांगितले.