Home /News /maharashtra /

मुंबईपाठोपाठ नागपूरमध्येही उद्या शाळेचं दार उघडणार नाही, पालिकेची घोषणा

मुंबईपाठोपाठ नागपूरमध्येही उद्या शाळेचं दार उघडणार नाही, पालिकेची घोषणा

सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता नागपूर शहरातील इयत्ता १ ते ७ च्या शाळा १० डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाही

सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता नागपूर शहरातील इयत्ता १ ते ७ च्या शाळा १० डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाही

सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता नागपूर शहरातील इयत्ता १ ते ७ च्या शाळा १० डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाही

    नागपूर, 30 नोव्हेंबर :कोरोनामुळे (corona) गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेली शाळांची दार 1 डिसेंबरपासून उघडणार आहे.  पण कोरोनाचा नवीन घातक व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आला आहे. त्यामुळे मुंबईतील मुंबईतील शाळा (School Reopen) उघडण्याचा निर्णय लांबणीवर पडला आहे. त्यापाठोपाठ आता नागपूरमधीलही (nagpur Municipal Corporation) शाळा उघडण्याचा निर्णय १० दिवस पुढे ढकलण्यात आला आहे. कोरोनाचा नवी व्हेरिएंट ओमायक्रॉन आढळून आल्यामुळे राज्यातील आरोग्य यंत्रणा खडबडून जागी आहे.  सध्या कोरोनाचा नवीन व्हेरिएंट लक्षात घेता नागपूर शहरातील इयत्ता १ ते ७ च्या शाळा १० डिसेंबरपर्यंत सुरू होणार नाही. शहरातील कोरोनाची परिस्थिती लक्षात घेता पुढील निर्णय घेतला जाईल अशा माहिती मनपा आयुक्त राधाकृष्णन बी यांनी दिली आहे. मांडव बनला आखाडा, डीजेवरून पाहुण्यांमध्ये तुफान हाणामारी; पाहा राड्याचा VIDEO तर दुसरीकडे, औरंगाबाद आणि मुंबई महानगरपालिकेकडून सुद्धा 1 तारखेपासून शाळा सुरू होणार नसल्याचं स्पष्ट करण्यात आलं आहे.तर औरंगाबादमध्ये महानगर पालिका हद्दीतील शाळा पहिली ते सातवीचे वर्ग उघडण्याबाबत 5 डिसेंबरनंतर निर्णय घेण्यात येईल असं प्रशासक आयुक्त आस्तिक कुमार पांडे यांनी स्पष्ट केलं आहे. Redmi Note 11T भारतातील सर्वात पॉवरफुल 5G फोन, 50MP कॅमेरासह मिळतील जबरदस्त फीचर त्यामुळे पहिली ते सातवीपर्यंतच्या शाळा सुरु होणार नाही. कोरोनाच्या नव्या ओमिक्रॉन व्हेरिएंटमुळे उद्या शाळा सुरू होणार की नाही ? शिक्षक आणि पालकांसमोर प्रश्नचिन्ह उभा होता. पण, कोरोनाचे नवे संकट पाहता शाळा उघडण्याचा निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे.
    Published by:sachin Salve
    First published:

    पुढील बातम्या