मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /Omicron चे रुग्ण आढळल्यामुळे शाळा बंद राहणार का? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर

Omicron चे रुग्ण आढळल्यामुळे शाळा बंद राहणार का? राजेश टोपेंनी दिले स्पष्ट उत्तर

'ओमायक्रॉनचे फक्त 8 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लादणे जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल.

जालना, 06 डिसेंबर : राज्यात सध्या ओमायक्रोनचे ( Omicron) 8 रुग्ण आढळून आल्यामुळे खळबळ उडाली आहे. त्यामुळे राज्यात पुन्हा निर्बंध लागणार का अशी चर्चा रंगली आहे. पण 'अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लादणे जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल. त्यामुळे तुर्तास नवे निर्बंध लादणार नाही, ज्या शाळा (school) सुरू आहे त्या सुरूच ठेवा आणि जे सुरू झाल्या नाही त्या पण सुरू करा', अशी माहिती आरोग्यमंत्री राजेश टोपे (rajesh tope) यांनी दिली.

राज्यात ओमायक्रॉनचे रुग्ण वाढत असल्यामुळे चिंतातूर वातावरण आहे. गेल्या दोन वर्षांपासून बंद असलेल्या शाळा 1 डिसेंबरपासून सुरू होणार होत्या. पण निर्णय लांबणीवर टाकण्यात आला आहे. राजेश टोपे यांनी शाळा सुरू करण्याबाबत स्पष्ट भूमिका मांडली.

'ओमायक्रॉनचे फक्त 8 रुग्ण आढळले आहे. त्यामुळे काळजी करण्याचे कोणतेही कारण नाही. अशा परिस्थितीत नवीन निर्बंध लादणे जनतेसाठी अडचणीचं आणि जाचक ठरेल. त्यामुळे तुर्तास नवे निर्बंध लादणार नाही, ज्या शाळा सुरू आहे त्या सुरूच ठेवा आणि जे सुरू झाल्या नाही त्या पण सुरू करा', असं टोपेंनी स्पष्टपणे सांगितलं.

महिलेनं कुत्र्याला बनवलं लेखक, प्राण्यांच्या भाषेतून केला इंग्रजीत अनुवाद

दर सोमवारी टास्क फोर्सची बैठक असते आज पण आहे. ओमायक्रॉनच्या पार्श्वभूमीवर बूस्टर डोस आणि लहान मुलांच्या लसीकरणाची टास्क फोर्सची भूमिका असून त्याप्रमाणे केंद्राला आग्रह करणार आहे. आज एनटीएजीआयची पण बैठक असून त्यामध्ये कदाचित यावर शिक्कामोर्तब होण्याची शक्यता आहे, असंही राजेश टोपे यांनी सांगितलं.

दरम्यान, हायरिस्क देशातून आलेल्या प्रत्येक प्रवाशांची आरटीपीसीआर टेस्ट केली जात असून पोजिटिव्ह आढळणाऱ्यांची जिनोमिक सिक्वेन्सिंग देखील केली जात आहे. याच बरोबर ओमायक्रोन पॉझिटिव्ह आढळून येणाऱ्याच्या व्यक्तीची देखील जिनोमिक सिक्वेन्सिंग करणे हा प्रोटोकॉल आहे. धारावीतील त्या रुग्णांची तशी काही हिस्ट्री असेल तर त्याची ही प्रोटोकॉलनुसार जिनोमिक सिक्वेन्सिंग टेस्ट होईल, अशी माहितीही राजेश टोपे यांनी दिली.

'जिनोमिक सिक्वेन्सिंगच्या 2 नवीन लॅब सुरू करणार'

राज्यात सध्याच्या ओमायक्रोनचे 8 रुग्ण आढळले असून त्यांच्या कॉन्ट्रॅक्ट ट्रेसिंगचे काम शासनाने युद्धपातळीवर हाती घेतलेले आहेत. त्यांचे स्क्रिनिंग आणि थ्री टी प्रिन्सिपलनुसार उपचार सुरू आहे. दररोज सुमारे 5000 प्रवाशी राज्यात दाखल होत असून त्यांची आरटीपीसीआर टेस्ट करून त्यातील पॉझिटिव्ह रुग्णांचे सॅम्पल जिनोमिक सिक्वेन्सिंग टेस्टसाठी पाठविले जातात. राज्यात सध्याला 3 ठिकाणी लॅब असून नवीन 2 जिनोमिक सिक्वेन्सिंग लॅब सुरू करण्यासाठी मुख्यमंत्रिस्तरावर प्रयत्न सुरू असल्याची माहिती राजेश टोपे यांनी दिली.

First published:

Tags: Rajesh tope, School