मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शाळा बंद, मग चालकाने स्कूल व्हॅनमध्येच थाटली उसाची रसवंती!

शाळा बंद, मग चालकाने स्कूल व्हॅनमध्येच थाटली उसाची रसवंती!

प्रश्नांवर खल करत बसण्याऐवजी अमरावतीच्या एका स्कूल व्हॅन चालकाने थेट या व्हॅनमध्येच रसवंती थाटली आणि रोजगाराचा तात्पुरता पर्याय शोधला.

प्रश्नांवर खल करत बसण्याऐवजी अमरावतीच्या एका स्कूल व्हॅन चालकाने थेट या व्हॅनमध्येच रसवंती थाटली आणि रोजगाराचा तात्पुरता पर्याय शोधला.

प्रश्नांवर खल करत बसण्याऐवजी अमरावतीच्या एका स्कूल व्हॅन चालकाने थेट या व्हॅनमध्येच रसवंती थाटली आणि रोजगाराचा तात्पुरता पर्याय शोधला.

अमतावती, 03 एप्रिल : कोरोनाच्या (Corona) संकटांमुळे सर्वच क्षेत्रांवर विपरित परिणाम झाल्याचा पाहायला मिळतोय. विविध क्षेत्रांमध्ये झालेलं नुकसान तर मोठं आहेच, पण त्याचबरोबर शाळा बंद (School) असल्याने त्यावर अवलंबून असलेल्या अनेकांवर जणू उपासमारीची वेळ आली आहे. जवळपास वर्षभरापासून शाळा पूर्णपणे बंद आहेत. तसंच भविष्यातही काही निश्चित नाही. त्यामुळं अनेकांवर आर्थिक संकट ओढावलंय. मात्र याचा सामना करत अमरावतीच्या सचिन बहादूरकर यांनी एक शक्कल लढवत किमान उदरनिर्वाहाचा प्रश्न सोडवलाय.

वर्षभरापासून शाळा पूर्णपणे बंद असल्यामुळे मुलांना शाळेतून ने-आण करणाऱ्या स्कूल व्हॅन चालकांसमोरही उपजीविकेचा प्रश्न निर्माण झाला. संपूर्ण राज्यातच अशी परिस्थिती निर्माण झाली. मात्र असे किती दिवस बसून राहणार? कर्ज काढून घेतलेल्या गाडीचे हप्ते कसे भरणार? कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा चालवणार असे एक ना अनेक प्रश्न या सर्वांसमोर होते. मात्र या प्रश्नांवर खल करत बसण्याऐवजी अमरावतीच्या एका स्कूल व्हॅन चालकाने थेट या व्हॅनमध्येच रसवंती थाटली आणि रोजगाराचा तात्पुरता पर्याय शोधला. सचिन बहादूरकर असे या व्हॅन चालकाचं नाव आहे.

वाचा - 400 दिवस कोरोनाबाधितांची सेवा; पण व्हायरस या डॉक्टरला काहीच करू शकला नाही कारण..

सचिन यांनी अमरावतीच्या गर्ल्स हायस्कूल चौकामध्ये ही रसवंती थाटली आहे. व्हॅनमध्ये विद्यार्थ्यांना बसवण्यासाठी लावलेले सीट काढून सचिन यांनी त्याजागी उसाचा रस काढण्याचे मशीन बसवले आहे. लोकांना लक्षात यावे म्हणून व्हॅनला बाजूने बॅनर लावून या व्हॅनला रसवंतीचा लूक त्यांनी दिला. ज्याठिकाणी शाळेची मुलं बसायची तिथं रसाचं मशीन दिसू लागलं. शाळा पूर्णपणे बंद झाल्याने उत्पन्न बंद झाले. पण घर चालणार कसे या विचारामुळे अशा प्रकारे रसवंती चालवून कुटुंबाचा उदरनिर्वाह भागवावा लागत असल्याची प्रतिक्रिया सचिन यांनी दिली.

वाचा - नागपूर: कोरोनानं घेतला बापलेकाचा बळी; दोन तासाच्या अंतराने कुटुंबावर दुहेरी आघात

सचिन हे या कोरोना संकटाच्या काळाच अडचणीत सापडलेल्या हजारो उदाहरणांपैकी एक आहे. त्यांनी सुचेल त्या प्रमाणे तात्पुरता मार्ग शोधला आहे. पण या काळात नोकऱ्या गेल्याने अनेकांचे संसार उघड्यावर आले. पुण्या-मुंबईत गेलेले हजारो तरुण पुन्हा मुळगावी परतले. कुठंतरी लहान-सहान कामं करून त्यांना आपला उदरनिर्वाह करावा लागत आहे. या सर्वांनाच लगेचच असा काही पर्याय सापडेलच असे नाही. पण या संपूर्ण अंधकारमय काळामध्ये सचिन सारखी काही उदाहरणे आशेचा एक किरण नक्कीच ठरू शकतील.

First published:

Tags: Corona, Unemployment