मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

काळ आला होता पण...,ट्रकच्या धडकेनंतर स्कुल व्हॅन पलटी; थोडक्यात बचावले विद्यार्थी!

काळ आला होता पण...,ट्रकच्या धडकेनंतर स्कुल व्हॅन पलटी; थोडक्यात बचावले विद्यार्थी!

या अपघातात व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

या अपघातात व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

गडचिरोली, 31 मार्च : 'देव तारी त्याला कोण मारी' या म्हणीचा प्रत्यय गडचिरोलीमध्ये (gadchiroli) आला. भरधाव ट्रकने शाळेचे विद्यार्थी घेऊन जाणाऱ्या व्हॅनला धडक दिली. त्यामुळे स्कुल व्हॅन पलटी झाली. या अपघातात 10 विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी विद्यार्थ्यांना तातडीने शासकीय रुग्णालयात उपचारासाठी दाखल केले आहे. सुदैवाने या अपघातात कोणतीही जीवितहानी झाली नाही.

गडचिरोलीत नवेगावात आज दुपारी हा विचित्र अपघात घडला.  नवेगाव खासगी शाळेच्या विद्यार्थ्यांना नेणारी स्कूल व्हॅन पंक्चर झाली होती. त्यामुळे दुरुस्तीसाठी रस्त्याच्या बाजूला उभी होती. त्याचवेळी  छत्तीसगडहुन येणाऱ्या ट्रकने व्हॅनला जोरात धडक दिली. भरधाव ट्रकची धडक बसल्यामुळे व्हॅन पलटी झाली. यावेळी व्हॅनमध्ये 14 हुन अधिक विद्यार्थी होती. अचानक झालेल्या या घटनेमुळे एकच खळबळ उडाली. व्हॅनला धडक दिल्यानंतर ट्रक रस्त्याच्या बाजूला असलेल्या वीजेचे खांबावर जाऊन आदळला.

('डझनभर पवार लाईनमध्ये रडत होते, आता', अजितदादांबद्दल सोमय्यांचा नवा दावा)

या अपघातात व्हॅनमध्ये असलेले दहा विद्यार्थी जखमी झाले आहे. जखमी झालेल्या विद्यार्थ्यांना जिल्हा सामान्य रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे. तर चार विद्यार्थी गंभीर जखमी झाले असून ट्रकची अपघातानंतर झालेली अवस्था बघितल्यास विद्यार्थ्यांचं दैव बलवत्तर म्हणून मोठी घटना टळली. या प्रकरणी ट्रकचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्याचे काम सुरू आहे.

बहिण-भावाचा अपघातात दुर्दैवी मृत्यू

तर दुसरीकडे, पुणे जिल्ह्यातील दौंड शहरातून जाणाऱ्या मनमाड-सांगली महामार्गावरील सोनवडी गावच्या हद्दीत आज दुपारी हा अपघात घडला. पिकअप आणि दुचाकीचा समोरासमोर धडक होऊन अपघात झाला. अनुष्का गणेश शिंदे, आदित्य गणेश शिंदे असं मृत्यू झालेल्या बहीण भावाचे नाव आहे. नेहमीप्रमाणे अनुष्का आणि आदित्य दोघेही आपल्या स्कुटीवरून शाळेत चालले होते. मनमाड-सांगली महामार्गावर सोनवडी गावजवळ पोहोचले असता समोरून येणाऱ्या भरधाव पिकअप व्हॅनने ओव्हरटेक करण्याच्या नादात स्कुटीला जोराची धडक दिली. हा अपघात इतका भीषण होता की, यामध्ये स्कुटीचा पुर्णपणे चुराडा झाला.

या अपघातात अनुष्का गणेश शिंदे, आदित्य गणेश शिंदे या बहिण भावांचा जागीच मृत्यू झाला. अपघातानंतर  पिकअपचा ड्रायव्हर पळून गेला. बहिण भावांच्या अपघाती मृत्यूमुळे कुटुंबावर दुखाचा डोंगर कोसळला आहे. या प्रकरणी पोलिसांत पिकअप व्हॅनचालकाविरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे. पोलीस फरार वाहनचालकाचा शोध घेत आहे.

First published: