स्कुल व्हॅन पलटी होऊन 10 विद्यार्थी जखमी, पोलीस येण्याआधी शाळेनं गाडीच लपवली!

स्कुल व्हॅन पलटी होऊन 10 विद्यार्थी जखमी, पोलीस येण्याआधी शाळेनं गाडीच लपवली!

अपघातानंतर पोलिसांच्या येण्याआधी अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पळवून नेऊन ती शाळेच्या आवारात ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आली होती

  • Share this:

मनमाड, 01 फेब्रुवारी : विद्यार्थ्यांना घेवून जाणारी व्हॅन पलटी होऊन  १० विद्यार्थी जखमी  झाले. या अपघातात 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर आहे. जखमींना मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आलं आहे. धक्कादायक म्हणजे, अपघातानंतर पंचनामा होण्याअगोदर व्हॅन लपवण्यात आली होती.

मनमाडपासून जवळ चांदवड रोडवर आज सकाळी विद्यार्थ्यांना शाळेत घेवून जाणारी व्हॅन पलटी झाली होती. या अपघातात १० विद्यार्थी जखमी झाले असून त्या पैकी 3 विद्यार्थ्यांची प्रकृती गंभीर असल्याने त्यांना मालेगावच्या खाजगी हॉस्पिटलमध्ये दाखल करण्यात आले आहे. सर्व विध्यार्थी हे शहरापासून जवळ असलेल्या कांचन सुधा इन्शट्यूट या शाळेतील असून ते नर्सरी शिकत आहे. व्हॅनचा अपघात झाल्याचं कळताच पालकांनी हॉस्पिटलमध्ये धाव घेतली.

दुसरीकडे अपघातानंतर पोलिसांच्या येण्याआधी अपघातग्रस्त वाहन घटनास्थळावरून पळवून नेऊन ती शाळेच्या आवारात ताडपत्रीने झाकून ठेवण्यात आली होती. शाळेच्या या कृत्यामुळे पालकांचा संताप अनावर झाला. अपघाताचा पंचनामा होणे गरजेचं असतांना वाहन घटनास्थळावरून हलवण्यात आल्यामुळे एका प्रकारे प्रकरण दाबण्याचा प्रयत्न केला जात असल्याचा आरोप नागरिक आणि पालकांनी केला आहे. या प्रकरणाचा पोलीस अधिक तपास करत आहे.

देवदर्शन ठरलं मृत्यूचं कारण, भीषण अपघातात एकाच कुटुंबातल्या 5 जणांचा अंत

पंढरपूरमध्ये वेळापूरजवळ शनिवारी (ता.1) सकाळी आठ वाजण्याच्या सुमारास टँकर आणि कारचा अपघात झाला. यामध्ये पाचजण जागीच ठार तर तीन गंभीर जखमी झाले आहेत. मृत्यू

वैराग येथील फलफले कुटूंबीय जेजुरी येथे सकाळी देवदर्शनाला जात होते. मात्र, वाटेतच त्यांच्यावर काळाने घाला घातला. वेळापूरजवळ पुणे-पंढरपूर महामार्गावर कार आणि सिमेंट वाहतूक करणाऱ्या टँकरची समोरासमोर धडक झाली. या भीषण अपघात कारचा चक्काचूर झाला आहे. या अपघातात कारमधील पाच जणांचा जागीच मृत्यू झाला. कार पुण्याहून वैरागकडे येत असताना हा अपघात झाला. अपाघातातील सर्वजण सोलापूर जिल्ह्यात वैराग येथील आहेत.

अपघात समयी गाडीत आठजण होते. त्यातील पाच जण ठार झाले आहेत. तर तीनजण गंभीर जखमी झाले. जखमी मध्ये तीन वर्षांची लहान मुलीचा समावेश आहे. त्यांच्यावर वेळापूर प्राथमिक आरोग्य केंद्रात उपचार सुरु आहेत.

First published: February 1, 2020, 5:55 PM IST

ताज्या बातम्या