मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

शिकवणीसाठी शाळेत बोलवून विद्यार्थिनीचं करायचा लैंगिक शोषण; यवतमाळमधील नराधम शिक्षकाचा कांड उघड

शिकवणीसाठी शाळेत बोलवून विद्यार्थिनीचं करायचा लैंगिक शोषण; यवतमाळमधील नराधम शिक्षकाचा कांड उघड

प्रातिनिधिक फोटो

प्रातिनिधिक फोटो

Rape in Yavatmal: यवतमाळमध्ये एका शिक्षकानं शिकवणीच्या नावाखाली शाळेत बोलवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण (Teacher raped minor student) केल्याची धक्कादायक घटना उघडकीस आली आहे.

  • Published by:  News18 Desk

यवतमाळ, 08 ऑगस्ट: कोराना विषाणूच्या संसर्गामुळे (Corona pandemic) मागील दीड वर्षांपासून राज्यातील सर्व शाळा बंद आहेत. विद्यार्थ्यांचं शैक्षणिक नुकसान होऊ नये म्हणून बहुतांशी शाळांनी ऑनलाइन शिक्षणाचा (Online education) पर्याय अवलंबला आहे. असं असूनही यवतमाळमधील एक शिक्षक मात्र शिकवणीच्या नावाखाली शाळेत बोलवून एका अल्पवयीन विद्यार्थिनीचं लैंगिक शोषण (teacher raped minor student ) केल्याचा धक्कादायक प्रकार उघडकीस आला आहे. आरोपी मागील दोन महिन्यांपासून पीडित मुलीचं लैंगिक शोषण करत होता.

गावकऱ्यांना संशय आल्यानं गावकऱ्यांनी अचानक शाळेत धाड टाकली आणि नराधम शिक्षकाला गावकऱ्यांनी रंगेहाथ पकडलं. गुरू शिष्याच्या नात्याला काळिमा फासणारी ही घटना समोर आल्यानंतर गावकऱ्यांनी नराधम शिक्षकाला बेदम चोप दिला आहे. अनेकांनी शिक्षकाला अर्धनग्न करत मारहाण केली आहे. या घटनेची माहिती पोलिसांना मिळाल्यानंतर पोलिसांनी घटनास्थळी धाव घेतली. पण गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला पोलिसांच्या हवाली करण्यास नकार दिला. पोलिसांसमोरही गावकऱ्यांनी शिक्षकाला बेदम मारहाण केली.

हेही वाचा-हुंड्यासाठी पत्नीची हत्या करणाऱ्या पतीला सरकारचा दणका, काढलं नोकरीवरुन

पण पोलिसांनी बलाचा वापर करत आरोपी शिक्षकाची संतप्त ग्रामस्थांच्या तावडीतून सुटका केली आहे. यानंतर पोलिसांनी पीडित मुलीच्या वडिलांनी दिलेल्या फिर्यादीनुसार गुन्हा दाखल केला आहे. पुढारीनं दिलेल्या वृत्तानुसार, अरुण राठोड असं अटक केलेल्या 55 वर्षीय नराधम शिक्षकाचं नाव आहे. तो मागील चार वर्षांपासून यवतमाळ जिल्ह्यातील बेलोरा येथील जिल्हा परिषद प्राथमिक शाळेत कार्यरत आहे.

हेही वाचा-30 वर्षीय अभियंत्याकडून छळ; छेडछाडीला कंटाळून 14 वर्षीय मुलीनं उचललं टोकाचं पाऊल

आरोपी शिक्षक एका अल्पवयीन विद्यार्थिनीला तुला चांगलं शिकवतो, तुला अव्वल गुण मिळतील, असं आमिष दाखवत गेल्या दोन महिन्यांपासून अत्याचार करत होता. शाळा बंद असतानाही तो शिकवणीच्या नावाखाली पीडितेला शाळेत बोलवत होता. रविवारीसुद्धा हा शिक्षक शाळेत दिसत असल्यानं त्याचं काहीतरी गैरवर्तन सुरू असल्याचा संशय वर्गातील विद्यार्थिनीसोबत गावकऱ्यांना आला होता. दरम्यान शनिवारी दुपारी शिक्षक शाळेत असताना ग्रामस्थांनी अचानक धडक दिली.

हेही वाचा-67 वर्षीय वृद्धाचा 19 वर्षीय तरुणीसोबत प्रेमविवाह; गावकऱ्यांचा खळबळजनक आरोप

तेव्हा गावकऱ्यांनी आरोपी शिक्षकाला गैरकृत्य करताना रंगेहाथ पकडलं आहे. नराधम शिक्षकाचं हे कृत पाहिल्यानंतर संतप्त झालेल्या ग्रामस्थांनी त्याला चांगलाच चोप दिला आहे. गावकऱ्यांनी आरोपीची दुचाकीसुद्धा देखील पेटवून दिली आहे. या घटनेचा पुढील तपास यवतमाळ ग्रामीण पोलीस करत आहेत.

First published:

Tags: Rape on minor, Yavatmal