Home /News /maharashtra /

कोरोनानं बाप हिरावला; थकीत फीसाठी शाळेनं दाखला अडवला, चिमुकलीची व्यथा वाचून पाणावतील डोळे

कोरोनानं बाप हिरावला; थकीत फीसाठी शाळेनं दाखला अडवला, चिमुकलीची व्यथा वाचून पाणावतील डोळे

कोरोना काळात घरातील कर्त्या व्यक्तीचं निधन झाल्यानं अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक चिमुकली लेकरं अनाथ झाली आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. असं असताना थकीत फीसाठी एका चिमुकलीची शाळेनं अडवणूक केली आहे.

पुढे वाचा ...
    तुळजापूर, 18 फेब्रुवारी: मागील जवळपास दोन वर्षांपासून महाराष्ट्रासह देशभरात कोरोना विषाणूनं थैमान (Corona pandemic) घातलं आहे. कोरोना विषाणूचा संसर्ग झाल्याने अनेकांनी आपल्या जीवाभावाची माणसं गमावली (Corona patients death) आहेत. घरातील कर्त्या व्यक्तीचं निधन झाल्यानं अनेकांवर दु:खाचा डोंगर कोसळला आहे. अनेक चिमुकली लेकरं अनाथ झाली आहेत. त्यामुळे कुटुंबाचा उदरनिर्वाह कसा करायचा हा प्रश्न अनेकांना पडला आहे. अशा स्थितीत उस्मानाबाद जिल्ह्याच्या तुळजापूर तालुक्यातील कसई गावात माणुसकीला काळीमा फासणारी घटना समोर आली आहे. शाळेची फी न भरल्याच्या कारणातून येथील एका शाळेनं अराधना नावाच्या मुलीचा दाखला देण्यास नकार दिला आहे. शाळेची फी भरल्याशिवाय दाखला मिळणार नाही, अशी भूमिका संबंधित शाळेनं घेतली आहे. संबंधित मुलीचे वडील हयात असताना ते शाळेची फी भरायचे, पण आता वडीलांचंच निधन झाल्यानं फी कशी भरायची हा प्रश्न कुटुंबीयांसमोर होता. हेही वाचा-पत्नीस जॉब करण्यास सांगणं म्हणजे कौटुंबिक हिंसाचार? कोर्टाचा महत्त्वपूर्ण निकाल त्यामुळे इंग्लिश मीडियमला शिकणारी अराधना आता परवडणाऱ्या दुसऱ्या शाळेत जाऊ इच्छित आहे. त्यासाठी तिला दाखला हवा आहे. पण थकीत फी भरा, मगच दाखला मिळेल, अशी भूमिका शाळेनं घेतली आहे. ही फी देखील कमी नसून तब्बल दोन लाख रुपये आहे. त्यामुळे शेतात मोलमजुरी करणाऱ्या महिलेनं एवढी रक्कम आणायची कुठून हा प्रश्न चिमुकलीच्या आईला पडला आहे. यामुळे संबंधित निराधार महिला आपल्या मुलीचं शिक्षण कसं पूर्ण करायचं या विचारानं हवालदिल झाली आहे. हेही वाचा-बायको मेली एकाची अन् अनुदानासाठी दावा ठोकला तिघांनी, बीडमधील धक्कादायक प्रकार यावेळी दाखला न मिळाल्याने चिमुकलीच्या डोळ्यात देखील अश्रू होते. चिमुकलीच्या डोळ्यातील अश्रू पाहून दगडाला देखील पाझर फुटला असता, पण शाळेनं फी वसुलीसाठी आपली दादागिरी सुरूच ठेवली आहे. गेल्या वर्षी पीडित मुलीच्या वडिलांचं कोरोना संसर्गामुळे निधन झालं आहे.
    Published by:News18 Desk
    First published:

    Tags: Osmanabad

    पुढील बातम्या