बाळासाहेब काळे, (प्रतिनिधी)
पुरंदर, 14 जून- एका 13 वर्षांच्या शाळकरी मुलीवर 55 वर्षांच्या नराधमाने बलात्कार केल्याची संतापजनक घटना उघडकीस आली आहे. सासवड पोलीस ठाण्याच्या हद्दीत कोडीत येथे ही घटना घडली आहे.
कोडीत धनगर समाजाचे कुटुंब मेंढ्या चारण्यासाठी पाल टाकून उतरले होते. गेल्या 10 जूनला सायंकाळी साडेचार वाजेच्या सुमारास मेंढपाळ कुटुंबातील 13 वर्षांची मुलगी पालाबाहेर खेळत होती. याच सुमारास आरोपी राजू बडदे हा तेथे दुचाकीवरून आला. त्याने शेतातून स्प्रिंकलर मशीन आणायचे आहे. मशीन धरून बसण्यासाठी तू माझ्याबरोबर चल, असे सांगत या मुलीला दुचाकीवरून शेतात घेऊन गेला. शेतात गोठ्यावर दुचाकी उभी करून तिला शेजारच्या चारीत स्प्रिंकलर मशीन आहे, ती घेऊन यायला सांगितले. ती चारीत गेल्यानंतर आरोपीने तिच्या पाठीमागे जाऊन तिला जीवे मारण्याची धमकी देऊन तिच्यावर बलात्कार केला. त्यानंतर तिला कोणाला सांगितलंस तर मारून टाकीन, अशी धमकी दिली. नंतर पीडित मुलीला पालाजवळच्या रस्त्यावर सोडून दिले.
घाबरलेल्या या मुलीने आपल्या घरी बहीण व आईला हा घडलेला प्रकार सांगितला. मुलीचे वडील बाहेरगावी गेले असल्याने घाबरून त्यांनी कोणाकडे ही याची वाच्यता केली नाही. गुरुवारी सायंकाळी वडील घरी आल्यानंतर त्यांना झाला प्रकार सांगितला. वडिलांनी मुलीला घेऊन थेट सासवड पोलीस ठाणे गाठून फिर्याद दिली. सासवड पोलिसांनी आरोपी राजू बापूराव बडदे (वय- 55, रा. कोडीत, पुरंदर) याला अटक केली आहे. आरोपीच्या विरोधात बलात्कार व बाललैंगिक अत्याचाराचा गुन्हा दाखल केला आहे.
मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार
मायानगरी अर्थात मुंबईत अल्पवयीन मुलीवर सामूहिक बलात्कार करण्यात आल्याची धक्कादायक माहिती समोर आली आहे. कफ परेडमधील आंबेडकर नगरमधील ही घटना आहे. दरम्यान, या प्रकरणातील 3 आरोपी फरार झाले आहेत. नराधम पीडितेला जबरदस्तीने एका खोलीत घेऊन गेले आणि त्यांनी सामूहिक बलात्कार केला. पीडित मुलीच्या आईने पोलीस ठाण्यात याबद्दल तक्रार दाखल केली आहे. या प्रकरणातील नराधमांची ओळख पटली असून तिन्ही आरोपी फरार आहेत. पोलीस सध्या आरोपींचा शोध घेत आहेत. आरोपींविरोधात गुन्हा देखील दाखल करण्यात आला आहे. या घटनेमुळे महिलांसाठी खरंच सुरक्षित आहे का? असा सवाल उपस्थित होत आहे.
VIDEO: चोरीला गेलेल्या बाळाचा 5 तासांत छडा, कुटुंबीयांना अश्रू अनावर