रेनकोट घरी राहिला म्हणून मुख्याधापकाने शाळेला ठोकलं टाळं आणि विद्यार्थ्यांना दिली सुट्टी!

रेनकोट घरी राहिला म्हणून मुख्याधापकाने शाळेला ठोकलं टाळं आणि विद्यार्थ्यांना दिली सुट्टी!

रेनकोट घरी राहिला आणि आपण घरी जाताना भिजू या भीतीने मुख्याधापकांनी शाळेला टाळं ठोकलं आणि विद्यार्थ्यांना घरी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.

  • Share this:

जालना, 12 जुलै : मुसळधार पावसामुळे रस्त्यावर आणि शाळेबाहेर पाणी साचतं आणि त्यामुळे शाळेला सुट्टी मिळते हे आपल्याला माहित आहे. पण रेनकोट घरी राहिला आणि आपण घरी जाताना भिजू या भीतीने मुख्यधापकांनी शाळेला टाळं ठोकलं आणि विद्यार्थ्यांना घरी सोडल्याचा प्रकार समोर आला आहे. या घटनेमुळे पालकांनी मोठा संताप व्यक्त केला आहे.

गेल्या अनेक दिवसांपासून महाराष्ट्रात मुसळधार पावसाने हजेरी लावली. यात सुरक्षेच्या दृष्टीने शाळांना सुट्ट्याही देण्यात आल्या. पण जालनामधील शाळेत घडलेला प्रकार धक्कादायक आहे. मंठा तालुक्यातील कोकरंबा गावातील जिल्हा परिषदेच्या प्राथमिक शाळेमध्ये 41 विद्यार्थी शिकतात. 1 ते 5 असे वर्ग या शाळेत भरतात. विद्यार्थी लांबून पायी चालत शाळेत येतात. पण त्याचं शाळेतील मुख्याधापकांनाच काहीच वाटत नाही असं म्हणायला लागेल.

शाळेचे मुख्याधापक एन.व्ही आघाव हे बुलढाणा लोणार इथून कोकरंबा असा रोज प्रवास करतात. शाळेत मुख्याधापक वेळेवर न येणं, शाळेचे नियम मोडले जाणं, शिक्षक वर्गात न येणं, मुख्याधापकांच्या आणि शिक्षकांच्या सुट्ट्या अशा तक्रारी वारंवार केल्या होत्या. त्यात आता आघाव यांनी केलेल्या प्रकारामुळे पालकांनी संताप व्यक्त केला आहे.

शाळेत येताना रेनकोट घरीच राहिला. त्यात ढगाळ वातावरणामुळे पावसाची रिमझिम सुरू झाली होती. आपण घरी जाताना भिजू या काळजीने मुख्याधापकांनी शाळा लवकर सोडली आणि कुलूप लावून निघून गेले. त्यांच्या या प्रकारामुळे त्यांना विद्यार्थ्यांच्या शिक्षणाची किती काळजी होते हे स्पष्ट होतं.

दरम्यान, आपल्या विद्यार्थ्यांना योग्यरित्या शिक्षण मिळत नाही. शिक्षक आणि शाळा प्रशासनाकडूनच शिक्षणात हलगर्जीपणा केला जात असल्याची टीका पालकांकडून करण्यात आली आहे. त्यामुळे यावर याता शाळा प्रशासन जागं होऊन कारवाई करणार का हे पाहणं महत्त्वाचं आहे.

VIDEO: विठुरायाच्या दरबारात मुख्यमंत्र्यांनी व्यक्त केली खंत

First published: July 12, 2019, 10:10 AM IST
Tags:

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading