Home /News /maharashtra /

कोरोनाचा धोका कायम! मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

कोरोनाचा धोका कायम! मुंबईतील शाळा 31 डिसेंबरपर्यंत बंदच राहणार, आयुक्तांचा निर्णय

कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना 23 नोव्हेंबर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता.

    मुंबई, 20 नोब्हेंबर: दिवाळीनंतर (Diwali) कोरोनाचा (Coronavirus) पुन्हा उद्रेक झाल्याने मुंबई महानगरपालिकेनं (Mumbai municipal Corporation) मोठा निर्णय घेतला आहे. सोमवारपासून (23 नोव्हेंबर) मुंबई महापालिका क्षेत्रातील एकही शाळा (Mumbai School) सुरू होणार नाही. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईतील सर्व सरकारी, खासगी शाळा बंदच राहातील, अशी माहिती मुंबई महापालिका आयुक्त इक्बाल चहल यांनी 'News18 लोकमत'शी माहिती दिली आहे. कोरोनाबाधित रुग्णांच्या संख्येत पुन्हा वाढ होत असताना 23 नोव्हेंबर शाळा सुरु करण्याचा निर्णय सरकारनं घेतला होता. हेही वाचा...पुणेकरांनो काळजी घ्या! 22 दिवसांत असं बदललं चित्र, महापौरांनी केलं आवाहन 'News18 लोकमत'ने विशेष वृत्तमालिका सुरू केली होती. याबाबत शिक्षक, विद्यार्थी आणि पालकांची मतं जाणून घेतली होती. त्यानंतर महापालिकेकडे पाठपुरवा देखील केला होता. त्यानंतर महापालिकेने शाळा सुरू करण्याचा निर्णय मागे घेतला. 31 डिसेंबरपर्यंत मुंबईत एकही शाळा सुरू होणार नाही, अशी माहिती महापालिका आयुक्तांनी दिली आहे. राज्यात सध्या जरी कोरोना नियंत्रणात असला तरी दिवाळीनंतर कोरोनाचा प्रादुर्भाव वाढू शकतो, असा अंदाज वर्तवला जात आहे. दिल्लीत गेल्या काही दिवसांपासून कोरोना रुग्णसंख्या वाढत चालली आहेत. त्या पार्श्वभूमीवर मुंबई महापालिकेकडून विविध उपाययोजना करण्यात येत आहेत. मुंबईत कोरोनाची स्थिती वाढू नये, याची काळजी घेत आहे. मार्च महिन्यापासून राज्यातली शाळा कॉलेजेस बंद असून Online अभ्यास सुरू आहे. दिवाळीची गर्दी आणि नागरिकांचा निष्काळजीपणा यामुळे पुन्हा कोरोनाने डोकं वर काढल्याची शक्यता व्यक्त केली जात आहे. काय म्हणाले शिक्षणमंत्री? दुसरीकडे, राज्याच्या शालेय शिक्षणमंत्री वर्षा गायकवाड यांनी आपली भूमिका स्पष्ट केली आहे. येत्या सोमवारपासून राज्यात शाळा सुरू करत आहे. पण शाळा सुरू करणे बंधनकारक नाही. राज्यातील विभागीय आयुक्त जिल्हाधिकारी यांच्याशी बोलून सांगणार स्थानिक पातळी परिस्थतीत कोरोनाची काय आहे हे ठरवून निर्णय घ्यावा. पालकांची संमती गरजेची असून विद्यार्थी शाळेत आलेच पाहिजे, असं बंधन नसणार आहे. शाळा जरी सुरू झाल्या तरी ऑनलाईन शिक्षण बंद नसेल त्यामुळे विद्यार्थ्यांच नुकसान होणार नाही. शाळेत विद्यार्थी आले नाही तरी त्यांना अॅटेन्डेन्स मार्क्स यावर परिणाम नाही, असंही शिक्षण मंत्र्यांनी स्पष्ट केलं आहे. पुण्यात 43 शाळा सुरू करण्याची तयारी दरम्यान, पुणे महापालिकेकडून राज्यशासनाच्या आदेशानुसार, माध्यमिक विभागाच्या 43 शाळा सुरू करण्याची तयारी केली आहे. मात्र, शाळा सुरू होण्यापूर्वीच धक्कादायक बाब समोर आली आहे. महापालिकेच्या भवानीपेठ येथील उर्दू शाळेच्या शिक्षकास कोरोनाची लागण झाली आहे. हेही वाचा..Coronavirus: भारतात कधी आणि किती रुपयांत मिळेल वॅक्सिन? महाराष्ट्रातही लागू होणार का पुन्हा Lockdown? Coronavirus च्या नव्या रुग्णांचा आलेख गेले काही दिवस महाराष्ट्रात सातत्याने घसरत होता. त्यामुळे दिलासा मिळत असतानाच गेल्या दोन दिवसात चिंता वाढवणारी आकडेवारी समोर आली आहे. Covid-19 चे हॉटस्पॉट ठरलेल्या मुंबई आणि पुण्यात कोरोनाचे रुग्ण पुन्हा वाढायला लागले आहेत. कोरोना मृत्यूंची संख्याही वाढते आहे. त्यामुळे शेजारच्या गुजरात राज्यात वाढत्या कोरोना संसर्गाच्या पार्श्वभूमीवर रात्रीचा कर्फ्यू लागू केला, तसा महाराष्ट्रातही करणार का याची चर्चा सुरू झाली आहे.
    Published by:Sandip Parolekar
    First published:

    Tags: Corona, Corona vaccine, Coronavirus, Maharashtra police, School

    पुढील बातम्या