• Home
 • »
 • News
 • »
 • maharashtra
 • »
 • मोबाइल नेटवर्कसाठी शाळकरी मुलं झाडावर चढली; वीज पडल्यानं मोठी दुर्घटना

मोबाइल नेटवर्कसाठी शाळकरी मुलं झाडावर चढली; वीज पडल्यानं मोठी दुर्घटना

पालघर येथील काही शाळकरी मुलं (School Children) मोबाईल नेटवर्कच्या (mobile network) शोधात झाडावर चढली (climb on tree) होती. पण त्याच झाडावर वीज कोसळल्यानं मोठा अपघात घडला आहे.

 • Share this:
  पालघर, 29 जून: मागील काही दिवसांपासून पालघर (Palghar) आणि कोकण परिसरात विजांच्या कडकडाटासह जोरदार पाऊस (Rain) पडत आहेत. दरम्यान पालघर येथील काही शाळकरी मुलं (School Children) मोबाईल नेटवर्कच्या (mobile network) शोधात झाडावर चढली (climb on tree) होती. पण त्याचवेळी झाडावर वीज कोसळल्यानं एका मुलाचा दुर्दैवी मृत्यू (Death) झाला आहे. तर अन्य तीन मुलं गंभीर जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमी मुलांवर रुग्णालयात उपचार सुरू असून एकाची प्रकृती गंभीर असल्याची माहिती समोर आली आहे. संबंधित घटना पालघर जिल्ह्यातील डहाणू तालुक्यात घडली आहे. डहाणूमध्ये सोमवारी सकाळपासूनच ढगाळ वातावरण होतं. दुपारनंतर डहाणू परिसरात मेघगर्जनेसह विजांच्या कडकडाटाला सुरुवात झाली. यावेळी मोबाइलला नेटवर्क येत नसल्यानं ही मुलं पाड्यापासून दीड किमी अंतरावर असणाऱ्या एका झाडावर चढली. पण सायंकाळी साडेचारच्या सुमारास संबंधित झाडावर अचानक वीज कोसळली. या दुर्घटनेत 17 वर्षीय रविन बच्चू कोरडा या शाळकरी मुलाचा जागीच मृत्यू झाला. तर दीपेश संदीप कोरडा (वय-11), चेतन मोहन कोरडा (वय-11) आणि मेहुल अनिल मानकर (वय-12 वर्षे) अशी तीन मुलं जखमी झाले आहेत. या तिन्ही जखमी मुलांवर कासा उपजिल्हा रुग्णालयांत उपचार सुरू आहेत. तर मेहुलला पुढील उपचारासाठी धुंदलवाडी येथील वेदांत रुग्णालयात दाखल करण्यात आलं आहे. हेही वाचा-सावधान! लहान मुलांवर हात उचलणं आई-वडिलांना पडणार महागात! थेट तुरुंगवासाची शिक्षा संबंधित मृत्यू पावलेला शाळकरी मुलगा रविन हा इयत्ता नववीच्या वर्गात शिकत होता. जखमी विद्यार्थी हे सहावी ते आठवीच्या वर्गात शिकत आहेत. गावात मोबाईलला नेटवर्क येत नसल्यानं ही मुलं ओसरविरा गावच्या मानकरपाडा येथील एका उंबराच्या झाडावर चढली होती. तर काहीजण झाडाखाली खेळत होती. दरम्यान वीज कोसळल्यानं मोठी दुर्घटना घडली आहे.
  Published by:News18 Desk
  First published: