मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

School Bus Accident : बच्चे कंपनीवर आलं होतं मोठं संकट, स्कूल बस रस्त्यावरून खाली उतरली, पण...

School Bus Accident : बच्चे कंपनीवर आलं होतं मोठं संकट, स्कूल बस रस्त्यावरून खाली उतरली, पण...

नायगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.

नायगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.

नायगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला.

विजय देसाई, 18 ऑगस्ट : नायगावमध्ये शालेय विद्यार्थ्यांना घेऊन जाणारी बस खड्ड्यात कलंडली. मात्र चालकाने बसवर नियंत्रण मिळवल्याने मोठा अपघात टळला. (School Bus Accident) स्थानिकांना आपतकालीन दरवाज्यातून मुलांना सुखरूप बाहेर काढण्यात यश आले आहे.

नायगाव पूर्वेच्या भागातून टीवरी फाटा रस्ता गेला आहे. या रस्त्यावरून अवर लेडी ऑफ वेलंकनी या शाळेची बस शाळा सुटल्यानंतर मुलांना घरी सोडण्यासाठी निघाली होती. मात्र याच दरम्यान सनटेकजवळील भागात पोहचताच वाहन चालकाचा अंदाज चुकल्याने रस्ता सोडून ही रस्त्याच्या कडेला गेली. यावेळी रस्त्याच्या कडेला खोलगट भागामुळे बसचा एका बाजूला तोल गेला होता.

हे ही वाचा : चुकीच्या रेल्वेत चढले म्हणून प्लॅटफॉर्म मारली उडी, डोके आणि हात चालले होते रेल्वेखाली, पण...LIVE VIDEO

बस एकाच बाजूने झुकल्याने त्यात असलेली शाळकरी मुले ही घाबरली होती. स्थानिकांनी तातडीने घटनास्थळी धाव घेत बसमध्ये असलेल्या शाळकरी मुलांना सुखरूप बाहेर काढले आहे. जवळपास यात 50 हून अधिक शाळकरी मुले होती. सुदैवाने ही बस कलंडली नाही अन्यथा मोठी दुर्घटना झाली असती. तातडीने दुसरी बस बोलावून या मुलांना बसवून घरी सोडण्याची व्यवस्था करण्यात आली होती.

हे ही वाचा : तरुणांच्या स्कुटीला विचित्र अपघात, पुलावरून 25 फूट खाली फेकले गेले, दोघे गंभीर

भिवंडीत मोठा अपघात

मित्राच्या वाढदिवसाची पार्टी करून परतणाऱ्या तरुणांच्या दुचाकीला भयंकर अपघात झाल्याची घटना भिवंडीमध्ये (bhiwandi) घडली आहे. भिवंडी शहरातील  राजीव गांधी उड्डाणपुलावरून (rajiv gandhi bridge bhiwandi) भरधाव वेगात जाणाऱ्या तरुणांची दुचाकी 25 फूट खाली पडून दोन तरुण  गंभीर जखमी झाले आहे. जखमी तरुणांना तातडीने रुग्णालयात दाखल करण्यात आले आहे.

भिवंडी शहरातील जकात नाका येथील राजीव गांधी उड्डाणपुलावर ही घटना घडली. सुसाट वेगात आलेल्या दुचाकीची पुलाच्या कठड्याला धडक बसल्याने दोन तरुण पुलावरून थेट 25 फूट खाली पडल्याने गंभीर जखमी झाले आहे. शंकर पवार, सादाब शेख, इरफान अंसारी असं जखमी झालेल्या तरुणांची नाव आहे. हे तिघे ठाकूर पाडा इथं वाढदिवसाची पार्टी करून स्कुटी वरून वेगात येत होते. शंकर पवार, सादाब शेख हे दोघे खाली पडले मात्र इरफान अंसारी हा पुला वरतीच पडल्याने तो पळून गेला आहे.

First published:

Tags: Accident, Mumbai News, Road accident

पुढील बातम्या