• Home
  • »
  • News
  • »
  • maharashtra
  • »
  • डोंबिवलीतील शाळा, काॅलेजमधील विद्यार्थी होते टॉर्गेट, तब्बल 1 कोटींचे LSD पेपर जप्त

डोंबिवलीतील शाळा, काॅलेजमधील विद्यार्थी होते टॉर्गेट, तब्बल 1 कोटींचे LSD पेपर जप्त

डोंबिवलीतील तरुणांना विशेष करून शाळा आणि कॉलेजमधील तरुणांना टार्गेट करून हे अंमली पदार्थांचे एलएसडी पेपर विकले जात होते.

  • Share this:
डोंबिवली, 21 जून: डोंबिवली (Dombivali) आणि कल्याणमध्ये (Kalyan) ठाणे क्राईम ब्रांचने (Thane Crime Branch) मोठी कारवाई केली आहे. एक-दोन नाही तर तब्बल 1466 LSD पेपर ठाणे क्राईम ब्रांचने जप्त केले आहे. एवढ्या मोठ्या प्रमाणावर अमलीपदार्थ बाळगणे ही आत्तापर्यंतची ठाणे पोलिसांच्या हद्दीतील सर्वात मोठी कारवाई आहे असं बोललं जात आहे. ठाणे अंमली पदार्थ विरोधी पथकाने डोंबिवली आणि कल्याण या दोन ठिकाणी धाडी टाकून तब्बल एक कोटी रुपयांपेक्षा जास्तीची अंमली पदार्थ जप्त केला. मिळालेल्या माहितीनुसार,  ठाणे पोलिसांच्या क्राईम ब्रांच ए पोलीस उपायुक्त लक्ष्मीकांत पाटील यांच्या मार्गदर्शनाखाली कारवाई करण्यात आली आहे. डोंबिवलीत भाविक ठक्कर मनी भार्गव राहणार रामचंद्र पार्क डोंबिवली पूर्व यांच्या घराची झडती घेतली असता यांच्या घरी 1,228 एलएसडी पेपर जप्त केले. तर या दोघांच्या चौकशीतून कल्याणमध्ये राहणारा निवांत विल्हेकर या 21 वर्षे तरुणाकडे 239 पेपर आहेत, अशी माहिती मिळाली. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थविरोधी पथकाने कल्याण पूर्वेतील अनमोल गार्डन हाजीमलंग रोड येथून निवांत विल्हेकर या तरुणाला अटक केली. ‘बॉलिवूड अभिनेत्रींपेक्षाही सुंदर’ स्मृती मंधानाच्या फोटोंवर नेटीझन्स घायाळ गेल्या अनेक दिवसांपासून डोंबिवलीतील रहिवाशी भागातून मोठ्या प्रमाणावर अंमली पदार्थांची तस्करी आणि विक्री केली जाते, अशी माहिती खबऱ्यामार्फत ठाणे पोलिसांच्या अंमली पदार्थ विरोधी पथकाला मिळाली होती. या माहितीच्या आधारे अंमली पदार्थविरोधी पथकाने डोंबिवली येथे गेली आठ दिवस पाळत ठेवली होती. यादरम्यान त्यांच्या हाती धक्कादायक माहिती लागली. डोंबिवलीतील तरुणांना विशेष करून शाळा आणि कॉलेजमधील तरुणांना टार्गेट करून हे अंमली पदार्थांचे एलएसडी पेपर विकले जात होते. Dry Cough: कोरड्या खोकल्याचा त्रास विसरा, हे 6 घरगुती उपाय करतील मदत सर्व माहिती मिळाल्यानंतर अंमली पदार्थविरोधी पथकाने डोंबिवलीतील रामचंद्र पार्क येथे सापळा रचला आणि वेळ बघून भाविक ठक्कर या तरुणाला अटक केली. भाविक याच्या घरातून जवळपास 95 लाख रुपयांचे अंमली पदार्थांचे पेपर जप्त केले तर कल्याणमध्ये राहणारा निवांत विल्हेकर यांच्याकडे पेपर असल्याची माहिती मिळाली.  या माहितीच्या आधारे निवांत विल्हेकरच्या घरी देखील धाड टाकली असता 239 अंमली पदार्थांचे एलजी पेपर पथकाने जप्त केले. या दोघांनाही न्यायालयामध्ये हजर केले असता भाविक विजय ठक्कर याला तीन दिवसांची पोलिस कोठडी सुनावण्यात आली आहे तर निवांत विलेकर रात्री उशिरा अटक केली.
Published by:sachin Salve
First published: