मराठी बातम्या /बातम्या /महाराष्ट्र /

'राफेल'प्रमाणेच राज्यातील पीकविमा योजनेतही घोटाळा - उद्धव ठाकरे

'राफेल'प्रमाणेच राज्यातील पीकविमा योजनेतही घोटाळा - उद्धव ठाकरे

"ज्या कंपन्यांना पीकविम्याचा अनुभव नाही अशा कंपन्यांना काम देण्यात आलं आहे. हजारो कोटींचा नफा या कंपन्यांनी कमावला"

"ज्या कंपन्यांना पीकविम्याचा अनुभव नाही अशा कंपन्यांना काम देण्यात आलं आहे. हजारो कोटींचा नफा या कंपन्यांनी कमावला"

"ज्या कंपन्यांना पीकविम्याचा अनुभव नाही अशा कंपन्यांना काम देण्यात आलं आहे. हजारो कोटींचा नफा या कंपन्यांनी कमावला"

    पंढरपूर, 24 डिसेंबर :  "शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडे काहीही योजना नाही अशी माहितीच सरकारने संसदेत दिली होती. देशभरात राफेल करार घोटाळा गाजत आहे. तसाच घोटाळा राज्यातही झाला आहे. राफेलप्रमाणेच पीकविमा योजनेतही घोटाळा झाला आहे. अस्तित्वात नसलेल्या कंपन्या स्थापन करून घोटाळा केला", असा आरोप शिवसेनेचे पक्षप्रमुख उद्धव ठाकरे यांनी केला आहे. "राज्य सरकारने कर्जमाफीची घोषणा केली पण शेतकऱ्यांची कर्जमाफी खरंच झालेली नाही. जर झाली असेल तर मुख्यमंत्र्यांपेक्षा मला जास्त आनंद होईल, पीकविम्याचे हफ्ते किती जणांना मिळाले" असा सवालच उद्धव ठाकरेंनी भरसभेत शेतकऱ्यांना विचारला. 'पी साईनाथ यांनी पीकविमा योजनेत राफेलप्रमाणेच घोटाळा झाला असा दावा केला आहे. पीकविम्यात सरकारच्या चार कंपन्या होत्या, पण तरीही 12 कंपन्यांना काम देण्यात आलं. ज्याप्रमाणे राफेल करारात इतर कंपन्यांना काम दिलं तसंच काम इथं देण्यात आलं' अशा शब्दांत उद्धव ठाकरे म्हणाले. 'ज्या कंपन्यांना पीकविम्याचा अनुभव नाही अशा कंपन्यांना काम देण्यात आलं आहे. हजारो कोटींचा नफा या कंपन्यांनी कमावला. शिवसेनेचे नेते संजय जाधव यांनी हा मुद्दा उपस्थितीत केला होता. पीकविम्यासाठी हफ्ते हजारो रुपयांचे हफ्त भरण्यात आले आहे. पण शंभर रुपयांचा चेक देण्यात आला', असंही उद्धव ठाकरे म्हणाले. 'युतीचा निर्णय जनता घेईल' मी काही भाजप, एनडीएचा विरोधक नाही. यावर बोलणार नाही. आम्ही आधीच ठरवलं आहे. पण युती करायची की, नाही हे जनता ठरवेल असं म्हणत उद्धव ठाकरे यांनी युतीवर बोलण्याचं टाळलं आहे. 'राम मंदिर बांधणारच' जो कुंभकर्ण झोपला आहे त्याला जागा करण्यासाठी मी अयोध्येत गेलो होतो. आता पंढरपुरातमध्येही मी हिंदूंना घेऊन इथं आलो आहे. तुम्ही झोपला असाल तरी देशातला हिंदू जागा झाला आहे. राम मंदिर बांधणार म्हणजे बांधणारच असंही उद्धव ठाकरे यांनी पुन्हा एकदा सांगितलं. 'व्यासपीठावर रामाची मूर्ती' आज दुपारी उद्धव ठाकरे पंढरपुरात पोहोचले. विठ्ठलाचं दर्शन घेतल्यानंतर उद्धव ठाकरेसह कुटुंब सभास्थळी पोहोचले. विशेष म्हणजे, व्यासपीठावर रामाची मूर्ती होती. रामाच्या मुर्तीसह विठ्ठल आणि शिवरायांची मूर्ती सुद्धा होती. रामाच्या आणि शिवरायांच्या मुर्तीला नमन केल्यानंतर उद्धव ठाकरेंच्या सभेला सुरूवात झाली. उद्धव ठाकरेंच्या भाषणातील मुद्दे - या मैदानावर सभा घेण्याचं धाडस कऱत नाही त्यामुळे मी इथेच सभा घेणार, शिवसेनाप्रमुखांचा वारसा घेऊन मी चाललो आहे - एक महिन्यापूर्वी मी शरयु नदीच्या किनारी होतो आणि आज बरोबर एक महिन्यानंतर चंद्रभागेतीरी आहे - देशात आज पहारेकरीही चोरी करायला लागले आहे - दुष्काळाची पाहणी करायला आलेले केंद्रीय पथक पटापट निघून गेले मात्र त्यालाही दोन महिने झाले - पंतप्रधानांनी पंढरपुरात येऊन केवळ मस्तकाला धूळ लावली तरी त्यांना पुण्य लाभेल. - शेतकऱ्यांचं उत्पन्न दुप्पट करण्यासाठी सरकारकडे काहीही योजना नाही अशी माहितीच सरकारने संसदेत दिली - वारकरी केवळ पंढरपुराची वारी कऱणारा नाही तर अन्यायावर वार करणारा आहे आम्ही छातीवर वार करतो, पाठीवर नाही - छत्तीसगड, राजस्थान आणि मध्य प्रदेशमध्ये मतदारांनी घाण साफ केली - अयोध्येनंतर पंढरपुरातही कुंभकर्णाला जागं करायला आलो आहे. राम मंदिर बांधल्याशिवाय आम्ही झोपणार नाही - जानेवारीमध्ये दुष्काळग्रस्त महाराष्ट्राचा दौरा करणार, दोन महिन्यांपासून शेतकऱ्यांची दैना आहे - मिझोराम आणि तेलंगणामध्ये प्रादेशिक पक्षांनी राष्ट्रीय पक्षांना धूळ चारली तर छत्तीसगडमध्ये आदिवासी समाजांनी पर्यायाचा विचार न करता आधी असलेली घाण स्वच्छ केली. अशी सफाई महाराष्ट्रातील शिवाजी महाराजांचा पक्ष करेल का? - काश्मीरपासून ते कन्याकुमारीपर्यंत जो काही समज भाजपनं निर्माण केला होता तो या पाच राज्यांच्या निवडणुकांच्या निकालात वाहून गेला आहे - हे सगळं मी दुष्काळग्रस्तांसाठी करतो आहे. मी येण्यापूर्वी अनेक शिष्टमंडळांना भेटलो. तिथे धनगर, महादेव कोळी यांना भेटलो. विठोबाच्या साक्षीनं मी धनगर आणि महादेव कोळी समाजाला वचन देतो की, मराठ्यांप्रमाणेच मी त्यांच्याही खांद्याला खांदा लावून उभा राहणार - सैन्याच्या पगारवाढीचा प्रस्ताव सरकारनं नाकारला मात्र त्यांच्यासाठी खरेदी केल्या जाणाऱ्या शस्त्रसामुग्रीच्य़ा खरेदीत घोटाळा करता - शेतकरी म्हणजे मधाचं पोळं आहे, जोवर मध मिळेल तोवर ठीक जेव्हा दगड माराल तेव्हा अंगाची आग करतील - राफेलप्रमाणेच पीकविमा योजनेतही घोटाळा - आस्तित्वात नसलेल्या कंपन्या स्थापून घोटाळा केला - विठोबाच्या चरणी एकच साकडं घातलं - ज्य़ांनी जनतेचं वाकडं केलं त्यांचं तुम्ही वाकडं करा - शेतकऱ्याचं पीककर्ज माफ होतं का, पीकविम्याची रक्कम मिळते का, पीकाला किंमत मिळते का? - मी भाजप, एनडीएचा विरोधक नाही. युती करायची की, नाही हे जनता ठरवेल. युतीवर मी आता बोलणार नाही - राम मंदिरांबद्दल नितिशकुमार आणि रामविलास पासवानांचं काय मत आहे हे स्पष्ट करावं आणि मग भाजपनं सांगावं की, त्यांनी या दोघांपुढे का नमतं घेतलं - राममंदिराचा मुद्दा मी निवडणुकीसाठी घेतला आहे. ताकाला जाऊन भांडं लपवणार नाही. उलट मी लोकांचा भांडाफोड करणारा आहे - निवडणुका आल्या की, यांच्या अंगात देव घुमायला लागतो. राम मंदिराच्या घोषणा करतो आणि भोळे हिंदू त्यांच्या घोषणांना भुलतात - तीस वर्ष होत आली तेव्हा आता तुम्ही म्हणताय की, हा मुद्दा कोर्टामध्ये आहे. मग त्याआधी का नाही याचाच सोक्षमोक्ष लावला - सोहराबुद्दीनच्या हत्येचा कट रचणारे सुटले पण राममंदिराची केस अजूनही सुरू आहे - भाजपनं राममंदिराच्या जीवावर रक्तपात केला, सत्ता कमावली आणि आता त्या गादीवर लोळत आहे - हे सरकार जनतेच्या खासगी आयुष्यात घुसखोरी करतंय मात्र आरोप काँग्रेस सरकारवर करतात - कांदा उत्पादक शेतकऱ्यांना त्यांच्या उत्पन्नाच्या खर्चात काहीही मिळत नाही. दुधउत्पादक शेतकऱ्यांना त्यांचा दर द्या - मला जागावाटपात स्वारस्य नाही, शेतकऱ्यांना पीकविम्याचा खर्च द्या, कांदा उत्पादकांना दर द्या, राम मंदिर बांधून द्या,पीककर्ज माफ करा - शिवसेनेच्या ग्रामीण भागातील सर्व शाखा शेतकऱ्यांचे आधारकेंद्र बनतील ========================
    First published:

    Tags: Pandharpur, Shivsena, Uddhav thackeray, Uddhav Thackery, उद्धव ठाकरे, पंढरपूर

    पुढील बातम्या