Home /News /maharashtra /

Bullock cart race in Maharashtra: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी; वाचा काय आहेत अटी

Bullock cart race in Maharashtra: महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी; वाचा काय आहेत अटी

bullock cart race in Maharashtra: बैलगाडा मालकांना मोठा दिलासा देणारी बातमी आहे. बैलगाडा शर्यतीला सशर्त परवानगी देण्यात आली आहे.

    नवी दिल्ली, 16 नोव्हेंबर : महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना (Bullock cart race) सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिली आहे. सुप्रीम कोर्टाने परवानगी दिल्याने आता महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा मार्ग मोकळा झाला असून तब्बल 7 वर्षांनी महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतीचा धुरळा उडणार आहे. सुप्रीम कोर्टाने सशर्त परवानगी दिल्याने नियमांचे सर्व पालन काटेकोरपणे करुनच बैलगाडा शर्यत पार पाडाव्या लागणार आहेत. (SC allow bullock cart race Bailgada sharyat in Maharashtra, know terms and conditions) बैलगाडा शर्यतींना सशर्त परवानगी राज्यात बैलगाडा शर्यती आयोजित कऱण्यास सुप्रीम कोर्टाची परवानगी सुप्रीम कोर्टाने घालून दिलल्या अटींचं पालन करुन शर्यत आयोजित करता येणार सर्वोच्च न्यायालयाने दिलेल्या या निकालानंतर आता या प्रकरणात घटनापीठासमोर सुनावणी होणार आहे. बैलगाडा शर्यत आयोजित कऱण्याच्या संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांकडून परवानगी घ्यावी लागणार आहे बैलगाडा शर्यत संदर्भात जिल्हाधिकाऱ्यांना माहिती देणे गरजेचे असणार बैलगाडा शर्यती दरम्यान बैलांना क्रूर वागणू देता येणार नाही 7 वर्षांनी महाराष्ट्रात बैलगाडा शर्यत आयोजित करण्याचा मार्ग मोकळा राज्याचे गृहमंत्री दिलीप वळसे पाटील यांनी म्हटलं, बैलगाडा शर्यतीवर असलेल्या बंदीमुळे शेतकरी नाराज झाले होते ही बंदी उठवण्यासाठी आम्ही प्रयत्नशील होतो. अखेर आज बैलगाडा शर्यतीला परवानी देण्यात आली आहे. या निर्णयामुळे निश्चितच सर्वांना आनंद झाला आहे. माझी शेतकऱ्यांना विनंती आहे की, ज्यावेळी सुप्रीम कोर्टाने सशर्त परवनागी दिली आहे त्यानुसार सर्वांनी नियमांचे पालन करुनच शर्यतीचं आयोजन करावं. वाचा : उद्धव ठाकरेंनी गद्दारांना दाखवला बाहेरचा रस्ता, रामदास कदम यांना मोठा धक्का शिवाजीराव आढळराव पाटील यांनी प्रतिक्रिया देत म्हटलं, माझ्या कानावर अजूनही विश्वास बसत नाहीये. आनंदाची गोष्ट आहे. गेल्या 7 वर्षांपासून आतुरतेने वाट पहात होतो. मुख्यमंत्री आणि पशुसंवर्धन मंत्री सुनील केदार यांचे विशेष आभार. शेतकऱ्याच्या जीवनात आनंद देणारी ही घटना आहे. काल 2 तास चांगले आर्ग्युमेंट झाले, राज्य शासनाची चांगली बाजू मांडली. कर्नाटक आणि तामिळनाडू मध्ये चालू असताना आपल्याकडे का नाही? या मुद्द्यावर चर्चा झाली, सुप्रीम कोर्टाने चांगला निर्णय दिलाय. राज्यातील बैलगाडा शर्यतीला एक प्राचीन परंपरा लाभली आहे. बैलगाडा शर्यत हा राज्यातील शेतकऱ्यांचा जिव्हाळ्याचा विषय आहे. त्यामुळे बैलगाडा शर्यत सुरू करण्याची मागणी जोर धर होती. तर दुसरीकडे प्राणीप्रेमी मात्र, या बैलगाडा शर्यतीला विरोध करत आहेत. भारतातील इतर राज्यांत बैलगाडा शर्यत सुरू भारतातील तामिळनाडू, कर्नाटक, मध्यप्रदेश, आंध्रप्रदेश, पंजाब, गुजरात, छत्तीसगढ येथे आजही बैलगाडा शर्यती सुरू आहेत. पण मुंबई उच्च न्यायालयाच्या स्थगितीमुळे महाराष्ट्रात बैलगाडा शर्यतींना बंदी घालण्यात आली आहे. त्यामुळे इतर राज्यांप्रमाणे महाराष्ट्रातही बैलगाडा शर्यत पुन्हा सुरू व्हाव्यात ही मागणी होत होती.
    Published by:Sunil Desale
    First published:

    Tags: Maharashtra, Supreme court

    पुढील बातम्या