स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

स्त्री शिक्षणाची ज्योत पेटवणाऱ्या क्रांतीज्योती सावित्रीबाई फुले

स्त्रीयांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी सावित्रीबाई फुलेंनी आयुष्यभर कार्य केले.सावित्रीबाई फुले यांची आज 189वी जयंती आहे.

  • Share this:

स्वातंत्र्याच्या 100 वर्षे आधी सावित्रीबाई फुलेंनी स्त्री शिक्षण, बालविवाहास विरोध, पुनर्विवाह, केशवपन बंदी, बालहत्या प्रतिबंध यासारख्या कार्यात महात्मा फुलेंच्या बरोबरीन काम केलं. स्त्रीयांना शिक्षित करण्यासाठी आणि त्यांच्या सन्मानासाठी सावित्रीबाई फुलेंनी आयुष्यभर कार्य केले.सावित्रीबाई फुले यांची आज 189वी जयंती आहे. सातारा जिल्ह्यातील नायगाव इथं 3 जानेवारी 1831 रोजी सावित्रीबाई फुले यांचा जन्म झाला. वयाच्या 9 व्या वर्षी त्यांचे जोतिबा फुले यांच्याशी लग्न झाले.

1848 मध्ये भिडेवाड्यात भारतातील मुलींची पहिली शाळा सुरू केली. या शाळेत सावित्रीबाईंनी सुरुवातीला शिक्षिका व नंतर मुख्याध्यापिका म्हणून काम केले. त्यानंतर त्यांनी 18 महिला शाळा त्यांनी सुरू केल्या. शैक्षणिक क्षेत्रासह समाजातील अनिष्ट चालीरीतींना त्यांनी आळा घालण्याचा प्रयत्न केला. विधवांचे केशवपन होऊ नये यासाठी लोकांचे प्रबोधन केले तसेच पुनर्विवाहाचा कायदा व्हावा म्हणून प्रयत्न केले.

फसवणूक झालेल्या किंवा इतर कारणांनी गर्भवती राहीलेल्या महिला आत्महत्या करीत असत किंवा भ्रूणहत्या करीत. या स्त्रीभ्रूणहत्या रोखण्यासाठी तसेच महिलांच्या सबलीकरणासाठी त्यांनी निकराचे प्रयत्न केले. यासाठी बालहत्या प्रतिबंधकगृहाची स्थापना केली. यातीलच एका अनाथ बालकास त्यांनी दत्तक घेतले.

समाजकार्य आणि साहित्य लेखन

सत्यशोधक समाजाच्या कार्यातही त्यानी महात्मा फुलेंना पाठबळ दिले. समाजकार्य करीत असताना साहित्याच्या माध्यमांतून आपले विचार मांडले. सावित्रीबाई या मराठीतील पहिल्या कवयित्री आहेत. त्यांचे काव्यफुले व बावनकशी, सुबोध रत्नाकर हे कावयसंग्रह प्रकाशीत झाले आहेत. 1896 च्या दुष्काळात व पुढे आलेल्या प्लेगच्या साथीच्या आजारावेळी गोर-गरिबांना मदतकार्य करत असताना प्लेगच्या आजारानेच त्यांचे निधन झाले.

सावित्रीबाईंच्या जन्मदिनी बालिकादिन

सावित्रीबाईंच्या कार्याचा गौरव म्हणून 1995 पासून 3 जानेवारी हा बालिकादिन म्हणून साजरा केला जातो. तसेच 10 मार्च 1998 रोजी भारताच्या डाक विभागाने त्यांचे टपाल तिकिटही काढले होते.

Published by: Suraj Yadav
First published: January 3, 2020, 10:38 AM IST

ताज्या बातम्या

corona virus btn
corona virus btn
Loading